एक्स्प्लोर

जर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार; 'या' नेत्यानं दंड थोपटले

Amit Thackeray vs Sachin Kharat: अमित ठाकरे माहीममधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर, मीसुद्धा माहिममधून महाविकास आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य सचिन खरात यांनी केलं आहे.

Mahim Assembly Constituency: मुंबई : जर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीममधून विधानसभा निवडणुकीच्या (Mahim Assembly Constituency) रिंगणात उतरणार असतील तर, मीसुद्धा माहिममधून महाविकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aaghadi) आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलं आहे. तसेच, पुढे बोलताना माहिममधून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहितीही सचिन खरात यांनी दिली आहे. दरम्यान, सचिन खरात यांनी थेट अमित ठाकरेंविरोधात दंड ठोपटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, मनसेची भूमिका मराठा, दलित, आदिवासी आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवाराला आमचा विरोध असणार आहे. त्यामुळेच जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी स्वतः माहीम विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे इच्छुक आहे, तशी मागणी आमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे मी करणार आहे.

सचिन खरात बोलताना म्हणाले की, "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण, मनसेची भूमिका मराठा, दलित, आदिवासी आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला आमचा विरोध असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हा महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. तसेच, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार असतील तर, याच मतदारसंघातून अमित ठाकरेंविरोधात मी स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे." 

अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमित ठाकरेंसाठी दोन जागांची चाचपणी सुरू आहे. सध्या त्यांनी दोनपैकी कोणत्या जागेवर निवडणूक लढवायची याबाबत विचारमंथन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील माहीम आणि भांडुप पश्चिम विधानसभा जागांचा आढावा घेतला जात आहे. शिंदे गटाचे सदा सरवणकर हे माहीममधून विद्यमान आमदार आहेत, तर ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर हे भांडुप पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
Embed widget