एक्स्प्लोर

Himachal Election Result 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसचा विजय; राहुल गांधी म्हणाले...

Rahul Gandhi Reaction on Himachal Election Result 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Elections 2022) मोठा विजय मिळवला आहे.

Rahul Gandhi Reaction on Himachal Election Result 2022: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Elections 2022) मोठा विजय मिळवला आहे. येथे पुन्हा एकदा सत्ते काँग्रेस (Congress) परतली आहे. यावरच आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले आहेत की, "या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमची मेहनत आणि समर्पण या विजयासाठी शुभेच्छांना पात्र आहे. मी पुन्हा आश्वासन देतो की, जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.''

Himachal pradesh Assembly Election 2022: हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताबदलाची प्रथा कायम

हिमाचल प्रदेशमधील (Himachal Election Result 2022) नागरिकांनी सत्ताबदलाची प्रथा कायम ठेवली असून पाच वर्षांनंतर काँग्रेस (Congress) पुन्हा सत्तेत आली आहे. पक्षाने एकूण 68 जागांपैकी 32 जागा जिंकल्या असून सात जागांवर आघाडीवर आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला 35 जागांची आवश्यकता असते. या निवडणुकीत भाजपने (BJP) 17 जागा जिंकल्या असून 9 जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

गुजरात निवडणुकीवर काय म्हणाले राहुल गांधी?

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावर बोलताना राहुल गांधी महाले आहेत की, गुजरातमध्ये जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही कठोर परिश्रम करून लढत राहू. ते ट्वीट करून असं म्हणाले आहेत.

हिमाचलच्या विजयावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''हिमाचल प्रदेश जिंकल्याबद्दल आम्ही मतदारांचे आभार मानतो.'' ते म्हणाले की, ''आमचे निरीक्षक जात आहेत आणि ते राज्यपालांना कधी भेटायचे ते ठरवतील. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि प्रियांका गांधी यांना धन्यवाद कारण, त्यांच्यामुळे आम्ही जिंकलो." छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, हिमाचल प्रदेशमध्ये मोठा विजय झाला आहे. तेथील जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर प्रियंका गांधींनीही भरपूर प्रचार केला. हा विजय तिथल्या मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget