हरियाणात भाजपची विजयी घोडदौड! भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले मी आधीच सांगितले होते..
Haryana Elections Results 2024: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत पक्षाच्या विजयाच्या ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे
Haryana Elections Results 2024: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत पक्षाच्या विजयाच्या ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, "प्रचार करून मी हरियाणातून परतल्यावर हरियाणात भाजपचा (BJP) मोठा विजय होईल, असे मी त्यावेळीच म्हटले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्गाचे कल्याण होत आहे. परिणामी, समाजाच्या कामाचा परिणाम हरियाणामध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
काँग्रेस हवेत उडत होती, पण....
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप, 34 मतदारसंघांमध्ये काँग्रेस, लोक दल 2 आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत (Haryana Elections Results 2024) सत्तास्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप (BJP) सहजपणे सत्ता स्थापन करेल. यावर बोलताना शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, "काँग्रेस हवेत उडत होती, पण भाजपने आपल्या कामांच्या जोरावर जनतेकडून मते मागितली. त्यामुळे आज असे निकाल येत आहेत की, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, ठोस कामे केली की जनतेचा आशीर्वादच हा मिळतोच.
गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले काम अभूतपूर्व आहे. काँग्रेसने असे कधीच केले नाही. काँग्रेसने समाजाला तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. हरियाणासह आज देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा आहे. असेही शिवराजसिंह चौहान म्हणाले.
हरियाणा विधानसभा मतमोजणीचे चित्र कोणत्याही क्षणी बदलणार?
हरियाणात फिरोजपुरा झिरका मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सर्वाधिक मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसचे मम्मन खान तब्बल 75468 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या नसीम अहमद यांच्यावर मम्मन खान यांची आघाडी. आतापर्यंत 19 पैकी 13 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपचे 11 उमेदवार दीड हजारांपेक्षाही कमी मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे 7 उमेदवार दीड हजारांपेक्षा कमी मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे ३ उमेदवार दीड हजारांपेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहेत. तर सध्या एकूण 20 उमेदवार 3 हजारांपेक्षाही कमी मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते.
हे ही वाचा