Goa Winner List : गोव्यात पुन्हा भाजपला संधी, गोव्यातील विजयी उमेदवारांची यादी येथे पाहा
Goa Election Result 2022 : गोव्यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्यात विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाणून घेऊया
Goa Election Result 2022 : आज निकाल असलेल्या राज्यात गोवा सर्वात छोटं राज्य असलं तरी महाराष्ट्रासह देशाचं लक्ष तिथल्या घडामोडींवर आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्यात अनेक मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले आहे. गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहे. मनोहर पर्रिकरांशिवाय होणारी ही गोवा विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता राखण्याचं आव्हान आणखी कठीण होतं. पण भाजप श्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी दिली आणि त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवल्याचे चित्र सध्या सध्या दिसत आहे.
आतापर्यंत गोव्यात विजयी झालेले उमेदवार (Goa Winners Complete list )
- भाजपचे डीलायल लोबो (शिवोली मतदारसंघ)- विजयी (BJP)
- भाजपचे दाजी साळकर (वास्को मतदारसंघ) - विजयी (BJP)
- भाजपचे रवी नाईक (फोंडा मतदारसंघ) - विजयी (BJP)
- विरेश बोरकर ((St. Andre) मतदारसंघ) - विजयी (Revolutionary Goans Party)
- अँथनी वाझ (कुठ्ठाळी मतदारसंघ) - विजयी
- जीत आरोलकर (मांद्रे मतदारसंघ) - विजयी
- भाजप मॉविन गुदिन्हो (दाबोळी मतदारसंघ) - विजयी (BJP)
- भाजपचे उल्हास तुयेकर (नावेली मतदारसंघ) - विजयी (BJP)
- भाजपचे निलेश काब्राल (कुडचडे मतदारसंघ) - विजयी (BJP)
- भाजपचे सुभाष फळदेसाई ( सांगे मतदारसंघ) - विजयी (BJP)
- व्हेन्झी व्हिएगास (बाणावली मतदारसंघ) - विजयी
- प्रविण आर्लेकर (पेडणे मतदारसंघ) - विजयी
- विश्वजीत राणे (वाळपाई मतदारसंघ) - विजयी
- दिव्या राणे (पर्ये मतदारसंघ) - विजयी
- बाबूश मोन्सेरात (पणजी मतदारसंघ) - विजयी
- जेनिफिर मोन्सेरा ( ताळगाव मतदारसंघ) - विजयी
- भाजपचे गोविंद गावडे ( प्रियोळ मतदारसंघ) - विजयी (BJP)
- गोवा फॉरवर्ड सरदेसाई (फातोर्डा मतदारसंघ) - विजयी
- अपक्ष चंद्रकांत शेट्ये (डिचोली मतदारसंघ) - विजयी
- संकल्प आमोणकर (मुरगाव मतदारसंघ) - विजयी
- भाजपचे गणेश गावकर (सावर्डे मतदारसंघ) - विजयी (BJP)
- भाजपचे उल्हास तुयेकर (नावेली मतदारसंघ) - विजयी (BJP)
- दिगंबर कामत (मडगाव मतदारसंघ) - विजयी (Congress)
-
अॅल्टन डिकॉस्ता ( केपे मतदारसंघ) - विजयी (Congress)
-
डॉ. प्रमोद सावंत (साखळी मतदारसंघ) - विजयी (BJP)
संबंधित बातम्या :
- Goa Election Result 2022 : अपक्षांना आम्ही सोबत घेणार, विजयानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...