Goa Election 2022 : 'हांव हायलो तुमका मेळपाक', आदित्य ठाकरेंची गोंयेकरांना साद, आजपासून प्रचारात
Goa Election 2022 : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला आजपासून उतरत आहेत.गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे
Goa Election 2022 : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊनसर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर भर देत आहेत.त्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे ही आता गोव्याच्या मैदानात प्रचाराला आजपासून उतरत आहेत.
आजपासून आदित्य ठाकरे जाणार
गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर उरलेले असताना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ठाकरे वास्को, पेडणे, साखळी येथे सभा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
शिवसेनेने कंबर कसली
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून 9 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यासोबतच शिवसेना एकूण गोव्यात 10 ते 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसंच गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
अदित्य ठाकरेंचा दौरा
शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता आदित्य ठाकरे यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी 3 वाजता ते वास्को येथील सभेला संबोधित करतील. तर, सायंकाळी 5.15 वाजता पेडणे येथील सभेला संबोधित करतील. शनिवारी सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता त्यांची साखळीत सभा होईल. तर सायंकाळी 4 ते 4.30 या वेळेत ते म्हापसा बाजारपेठ परिसरात घरोघरी भेट देऊन प्रचार करतील.
शिवसेनेला यंदा तरी यश मिळणार का ?
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना गोवा विधानसभा निवडणूक लढवत आहे. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली असून, शिवसेनेने पेडणे, शिवोली, म्हापसा, साखळी, मांद्रे, हळदोणा, पर्ये, वाळपई, वास्को, केपे आणि कुठ्ठाळी या 11 मतदारसंघांत उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेने पणजीतही उमेदवार दिला होता. पण, पणजीतून माघार घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha