Sangli Municipal Corporation Election: सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा तगडा झटका!
Sangli Municipal Corporation Election: दुसरीकडे सांगली महापालिका निवडणूक लढवण्याच्या रणनीतीबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात अजित पवार यांच्या सोबत बैठक पार पडणार आहे.

Sangli Municipal Corporation Election: सांगली महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या मूडमध्ये असलेली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सांगली महापालिकेतील आणखी काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला आहे. दुसरीकडे सांगली महापालिका निवडणूक लढवण्याच्या रणनीतीबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात अजित पवार यांच्या सोबत बैठक पार पडणार आहे.
कोणत्या नगरसेवकांनी उमेदवारी मागितली?
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाजकल्याण समितीच्या माजी सभापती, माजी नगरसेविका स्नेहल सचिन सावंत यांच्यासह सांगलीतील चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक सचिन सावंत, माजी नगरसेविका स्नेहल सावंत, माजी नगरसेवक अभिजीत भोसले, माजी नगरसेविका नसीमा नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते राज्याक नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पक्ष प्रवेशानंतर अजित पवार काय म्हणाले?
या पक्षप्रवेशामुळे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पक्षाला हादरा बसला आहे. सामाजिक स्तरावर काम मार्गी लावण्यासाठी तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत, याचा आनंद आहे. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, अशा शब्दात अजित पवार यांनी प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या. भाजपमधील उमेदवारी निश्चितीबाबत सुरू असलेला घोळ आणि गटबाजी यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे दिग्गज नगरसेवक सुद्धा भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















