एक्स्प्लोर
Advertisement
नवमतदार 2019 च्या निवडणुकीचा निकाल ठरवणार
2019 च्या निवडणुकीचं बिगुल आता अवघ्या काही दिवसांत वाजणार आहे. निवडणूक जवळ आली की सामान्य माणसाचं रुपांतर मतदारराजात होतं. त्याच्या विनवण्या करण्यासाठी राजकारण्यांची पायपीट सुरु होते. यावेळचं चित्र तर असं आहे की विजयासाठी नेत्यांना सर्वात जास्त झुकावं लागणार आहे तरुणाईसमोर. पहिल्यांदा मतदान करणारेच या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत.
नवी दिल्ली : 2019 मध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा, याचा निकाल देशातल्या नवमतदारांच्या हातात आहे. या नवमतदारांची संख्या इतकी महत्त्वाची आहे, की ते ज्याच्या बाजूला त्याचा विजय पक्का अशी स्थिती आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी देशात एकूण 90 कोटी मतदार आहेत, त्यापैकी जवळपास 8 कोटी मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
18 ते 22 या वयोगटातला तरुण हा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहे. यातल्या अनेकांना विधानसभेसाठी मतदानाची संधी मिळालीही असेल. पण 2019 ला पहिल्यांदाच ते लोकसभेसाठी मतदान करतायत. सरासरी लक्षात घेतली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जवळपास दीडलाख मतदार हे पहिल्यांदाच मतदान करत आहेत. एखाद्या मतदारसंघाचा निकाल फिरवण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे, हे या आकडेवारीवरुन सहज कळू शकेल.
2014 च्या संख्येशी तुलना केली तर 282 लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी मागच्या वेळच्या मताधिक्यापेक्षा नवमतदार हे जास्त आहेत. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी तब्बल 12 जागांचा यात समावेश आहे. या नवमतदारांचं महत्त्व लक्षात घेऊनच प्रत्येक पक्षाने त्यांना प्रभावित करण्यासाठी मोहीमा आखल्या आहेत. भाजपच्या युवा मोर्चाने 'पहला वोट मोदी के नाम' हे अभियान सुुरु केलं आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने 'पहला वोट देश के नाम'चं आवाहन केलं आहे. या नवमतदारांची नोंदणी करण्यापासूनच त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न पक्षांचा आहे.
देशातल्या एकण मतदारांच्या संख्येत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशात एकूण मतदारांच्या 16.2 टक्के तर महाराष्ट्रात 9.6 टक्के मतदार आहेत. देशातल्या एकूण 90 कोटी मतदारांमध्ये 24 वर्षाखालच्या मतदारांची संख्या 25 टक्के इतकी आहे. त्यामुळे तरुणाईच देशाची गादी कुणाच्या हातात द्यायची याचा फैसला करणार आहे. प्रश्न हा आहे की या तरुणाईच्या हिताचे नोकरी, बेरोजगारीचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहणार की भावनिक मुद्द्यांवर तरुणाईला भडकवण्याचा प्रयत्न होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement