एक्स्प्लोर

Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Exit Poll : पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. 

नवी दिल्ली : आज पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे. पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट  पोल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येऊ शकते, असं बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजात म्हटलं गेलंय. तर आसाम आणि केरळमध्ये काय होणार याबाबत एक्झिट पोलनं काय अंदाज वर्तवले आहेत, ते पाहणं महत्त्वाचं आहे. आसाममध्ये गेल्या दोन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, तर केरळमध्ये डाव्या पक्षांचं सरकार आहे. या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलनं काय अंदाज  वर्तवलेत ते पाहूयात.

आसाममध्ये कोणाची सत्ता?

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी 4 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. आसाममध्ये गेल्या दोन टर्म पासून भाजप सत्तेत आहे. आसाममध्ये मतदारसंघ फेररचनेनंतर निवडणूक होत आहेत. तिथं एकूण 126 जागांसाठी मतदान झालं होतं. या साठी 722 उमेदवार रिंगणात होते. एक्सिस माय इंडियानुसार आसाममध्ये भाजप 88 ते 100 जागा जिंकेल. तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळतील. आसाममध्ये भाजपला 48 टक्के मतं मिळू शकतात तर काँग्रेसला 39 टक्के मतं मिळतील, इतरांना 14 टक्के मतं मिळतील  असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे. 

2021 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आसाममध्ये भाजपला 75 जागांवर विजय मिळाला होता. तर, काँग्रेस आघाडीला 50 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसून येत आहे.

केरळमध्ये काँग्रेसची सत्ता, डाव्या पक्षांची सत्ता जाणार?

केरळमध्ये  एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्तांतर होऊ शकतं. देशात सध्या डाव्या पक्षांची सत्ता एकमेव केरळ राज्यात आहे.  एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार इथं काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूडीएफला 78 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 0-3 जागा मिळू शकतात. डाव्या पक्षांच्या एलडीएफला 140 जागांपैकी  49 ते 62 जागा मिळू शकतात. 

दरम्यान, केरळमध्ये गेल्या दोन टर्मपासून डाव्या पक्षांचं सरकार सत्तेत होतं. यावेळी त्यांना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी होती. केरळमधील मतदारांचा नेमका कौल काय आहे, याचं उत्तर 4  मे रोजी मिळणार आहे. एक्सिस माय इंडियानुसार केरळमध्ये 50 ते 60 जागा डाव्या पक्षांना मिळू शकतात. 

केरळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी 99 जागा मिळवल्या होत्या. तब्बल 1977 नंतर केरळमध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत दाखल झालं होतं. तर, 2021 मध्ये  यूडीएफला  41 जागा मिळाल्या होत्या.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget