एक्स्प्लोर
Exit Poll 2019 Uttar Pradesh (UP): उत्तर प्रदेशात एनडीएला मोठा धक्का, महागठबंधनची महामुसंडी
एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेशात एनडीएला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाचे महागठबंधन जोरदार मुसंडी मारणार असल्याचे या अंदाजातून समोर आले आहे.
Uttar Pradesh Exit Polls 2019 : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र त्याआधी एक्झिक्ट पोलच्या माध्यमातून या निकालांचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेशात एनडीएला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाचे महागठबंधन जोरदार मुसंडी मारणार असल्याचे या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आले आहे.
सर्वाधिक 80 लोकसभा क्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्यावेळी 73 जागा जिंकणाऱ्या एनडीएला यावेळी केवळ 33 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर युपीएला गेल्यावेळी इतक्याच म्हणजे 2 जागा मिळतील असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त केला आहे. सपा-बसपा महागठबंधन यावेळी मोठी मुसंडी मारणार असल्याचा अंदाज आहे. 45 जागांवर सपा-बसपा आघाडी विजयी होईल असा अंदाज आहे.
लोकसभेच्या 542 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. केंद्रात कोणाची सत्ता येणार, याचा फैसला होईलच, मात्र 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालांचा अचूक आणि विश्वसनीय अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
उत्तर प्रदेश (2019)
एनडीए - 33
सपा-बसपा - 45
काँग्रेस - 02
उत्तर प्रदेश (2014)
एनडीए - 73
युपीए- 02
सपा- बसपा- 04
इतर - 01
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement