एक्स्प्लोर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' महिला निवडणूक अधिकाऱ्याशी खास बातचीत

पिवळी साडी नेसलेल्या आणि हातात इव्हीएम मशीन असलेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पिवळी साडी नेसलेल्या आणि हातात इव्हीएम मशीन असलेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला निवडणूक अधिकारी गाझियाबाद मधील आहे असं कोणी सांगतंय तर कोणी हरियाणा मधील आहे, असा दावा करतंय. मात्र 'एबीपी न्यूज'ने या व्हायरल फोटोतील महिलेचा शोध घेतला आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे. व्हायरल झालेल्या या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे रिना द्विवेदी. त्या लखनऊ येथील रहिवासी असून तेथील निर्माण भवनमध्ये त्या काम करतात. लखनऊ येथे त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबाबत रिना यांना विचारलं असता 'मी फक्त माझी ड्यटी करत होते', असं त्यांनी सांगितलं. "पारंपारिक भारतीय वेशभुषेत मी निवडणुकीच्या ड्युटीवर गेले होते. मी नेहमी अशाच पेहरावात असते", असंही रिना यांनी सांगितल. मोहनलालगंज येथील एका मतदान केंद्रावर रिना यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी हातात ईव्हीएम मशीन घेऊन जात असतानाच्या त्यांच्या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. तसेच या महिला अधिकारी ड्युटीवर असलेल्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाल्याचा मेसेज देखील या फोटोसोबत व्हायरल करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे रिना यांनी सांगितले. त्या ड्युटीवर असलेल्या मतदान केंद्रावर 70 टक्के मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. व्हायरल फोटोबाबत बोलताना रिना म्हणाल्या की, "त्या दिवशी मी माझ्या कामात व्यस्त होते. लोकांनी फोटो क्लिक केले ते व्हायरल झाले. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र त्याकडे मी फार लक्ष देत नाही. मी आणि माझे कुटुंब या सगळ्या गोष्टींना सकारत्मक नजरेने पाहते". यापुर्वी 2017 मध्ये देखील निवडणूक कामात असतानाचा रिना यांचा फोटो व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget