Devendra Fadnavis : गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
म्हैसाळ योजनेला दोन हजार कोटी दिले. जत तालुक्यातील 64 गावातील दुष्काळ आपण नेहमीसाठी भूतकाळ करायचं ठरवलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis : जत विधानसभा हा महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहेच पण माझा गोपीचंद या जतमधून विधानसभा लढत आहे, गोपीचंद यांनी निवडणुकीत निवडून द्या, जतचा विकास करून एक नंबरवर आणतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जतच्या विकासाची गॅरेंटी हा देवाभाऊ घेत असल्याचे ते म्हणाले.
दुष्काळ आपण नेहमीसाठी भूतकाळ करायचं ठरवलं आहे
फडणवीस यांनी सांगितले की, बाकी लोकांसाठी जत मतदारसंघ शेवटचा असेल पण माझ्यासाठी हा एक नंबरचा मतदारसंघ आहे. जत विधानसभा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहेच पण माझा गोपीचंद या जतमधून विधानसभा लढत आहे. गोपीचंदला या निवडणुकीत निवडून द्या, जतचा विकास करून जत एक नंबरवर नेतो. काही नेते म्हणतात जतला पाणी गेले तर आमचा ऊस तोडायला कोण येणार नाही. मुठभर लोकांनी जतचा दुष्काळ पुसण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. कृष्णा कोयना उपसा सिचन योजनेसाठी आठ हजार 72 कोटी रुपये दिले. म्हैसाळ योजनेला दोन हजार कोटी दिले. जत तालुक्यातील 64 गावातील दुष्काळ आपण नेहमीसाठी भूतकाळ करायचं ठरवलं आहे, या गावांमध्ये बागायती शेती लवकरच होईल. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी या सिंचन योजना बंद होत्या. टेंभू उपसा सिंचन योजनाला 7 हजार 370 कोटी रुपये आपण दिले. यामुळे सांगली जिल्ह्यात दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली. उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जा देण्याचा आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज बिल भरावे लागणार नाही. याचा पहिला प्रयोग म्हैसाळ योजनेवर केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळ स्थापन केले तर रामोशी समाजासाठी उमाजी राजे नाईक आर्थिक विकास महामंडळ लोणार समाजासाठी देखील महामंडळ स्थापन केले. गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील उमदीमध्ये एमआयडीसी मंजूर केली आहे. या एमआयडीसीत उद्योग मंजूर करायची जबाबदारी माझ्यावर राहिल, असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी अनेक चाणक्यांना घरी बसवलं
गोपीचंद पडळकर म्हणाले की, जतच्या दुष्काळाचा कलंक कृष्णा नदीच्या पाण्याने पुसायची धमक फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. फडणवीस यांनी दोन हजार कोटीच्या सिंचन योजनांना मंजूरी दिली, पण फडणवीस योजनेचा साधा नारळ फोडायला आले नाहीत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाचा कलंक पुसण्याचे काम केले. फडणवीस यांनी अनेक चाणक्यांना घरी बसवला आहे. जतमध्ये क्रांती होणार आहे. विरोधक माझ्यावर तुटून पडत आहेत, विलासराव जगताप, आमदार विक्रम सावंत हे माझे शत्रू नाहीत. जतचा दुष्काळ हा माझा पहिला शत्रू तर दुसरा शत्रू ऊसाचा कोयता आणि तिसरा शत्रू जत तालुक्यातील बेरोजगारी असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या