Eknath Shinde and Amol Khatal : बाळासाहेब थोरातांचा पराभव केलेल्या नेत्याला मुख्यमंत्र्यांनी विमान पाठवलं
Eknath Shinde and Amol Khatal, मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या अमोल खटाळ यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विमान पाठवलं आहे.
Eknath Shinde and Amol Khatal, मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज आणि फायरब्रँड नेत्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. यामध्ये यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात यांचा देखील समावेश आहे. बाळासाहेब थोरात गेल्या 40 वर्षांपासून संगमनेरचे आमदार होते. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागलाय. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने अमोल खटाळ यांना तिकीट दिलं होतं. अमोल खटाळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केलाय.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या अमोल खटाळ यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान पाठवलं आहे. शिर्डी विमानतळावरून काही वेळाने अमोल खताळ होणार मुंबईकडे रवाना होणार आहेत. थोड्याच वेळात सुजय विखे संगमनेरात आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यासह सुजय विखे राहणार संगमनेर शहरात सोहळ्याला हजर राहणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांना विमान व्यवस्था
नांदेड जिल्ह्यातील शिंदे गटाचे तीन आमदार विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांना विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. हदगावचे बाबुराव कदम, नांदेड दक्षिणचे आनंद तिडके बोढारकर तर नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर मुंबईला निघाले आहेत. सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीचे सर्व आमदार मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी विजय खेचून आणलाय. नांदेड जिल्ह्यातील आम्ही तिघेही आमदार मुंबईकडे निघालो आहोत सोमवारी शपथविधी सोहळा होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच मार्गदर्शन होणार आहे. नांदेड जिल्ह्याला मंत्री पद मिळणार का? हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेनेचे सर्व विजयी आमदार मुंबईला येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत सर्व आमदार मुंबईला आल्यानंतर होणार बैठक पार पडणार आहे. अंदाजे संध्याकाळी 6 वाजता सर्व आमदारांची बैठक पार पडणार असून या बैठकीत गट नेता निवडला जाणार, तसेच इतर महत्त्वाची पदे दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या