बंडखोर उमेदवारांमुळे राज्यातील सत्तेची सूत्र बदलणार? उत्तर महाराराष्ट्रासह राज्याचे राजकीय गणित काय?
Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान या बंडखोर उमेदवारांमुळे राज्यातील सत्तेची सूत्र बदलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. तर आज अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत ही निवडणुक अधिक रंगतदार केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान या बंडखोर उमेदवारांमुळे राज्यातील सत्तेची सूत्र बदलणार का? की या बंडखोरीचा मविआ आणि महायुतीपैकी कोणाला फटका बसतो तर कोणाला फायदा होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान बंडखोर उमेदवारांमुळे उत्तर महाराराष्ट्रासह राज्याचे राजकीय गणित काय हे जाणून घेऊया.
नाशिक जिल्हा
महायुती: नाशिक जिल्ह्यात महायुती मध्ये नांदगाव, देवळाली, चांदवड या तीन ठिकाणी तर महाविकास आघाडीमध्ये इगतपुरी या एका ठिकाणी बंडखोरी झाली आहे. ज्यात नांदगाव मधील बंडखोर उमेदवार समीर भुजबळ यांच्यामुळे नांदगाव येथील महायुती शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे हे अडचणीत आले आहे. नांदगाव येथे समीर भुजबळ यांच्या बंडखोरीमुळे तिरंगी लढत होणार असून फटका महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनाच बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीने दोन अधिकृत उमेदवार दिले आहे. अजित पवार गटाकडून सरोज आहेत तर, शिंदे गटाकडून राज्यश्री अहिरराव उमेदवारी करत आहे. महायुतीतील या दोन मैत्रीपूर्ण लढतीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना फायदा होण्याची शक्यता आहे तर, महायुतीच्या दोन उमेदवारांचा विजयाचा मार्ग मात्र अडचणीत सापडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच चांदवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल आहेर यांच्याविरोधात त्यांची बंधू केदा आहेर यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार राहुल आहेर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे तर, चांदवड मतदार संघातून महाविकास आघाडीने काँग्रेसचे शिरीष कोतवाल हे उमेदवारी करत आहे त्यामुळे युतीच्या उमेदवाराची अडचण वाढली आहे.
महाविकास आघाड
इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार निर्मला गावित यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत आला असून महायुती अजित पवार गटाचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा विजयाचा मार्ग सुखकर झाल्याचं बोललं जात आहे.
जळगाव जिल्हा
जळगाव शहर मतदारसंघात महायुतीमधे भाजपचे अश्विन सोनावणे यांनी बंडखोरी केली आहे. याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेनेचे कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी केली आहे. तर अमळनेर मतदार संघात महायुतीमधे शिरीष चौधरी यांनी बंडखोरी केली आहे. पाचोरा मतदार संघात महायुतीमध्ये भाजपचे अमोल शिंदे तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ यांनी बंडखोरी केली आहे. एरंडोल मतदार संघात
महाविकास आघाडीमधे शिवसेनेचे डॉ. हर्षल माने तर, महायुतीमधे अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये 1 बंडखोरी झाली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये 3 ठिकाणी बंडखोरी आणि 1 मैत्रीपूर्ण लढत होत आहे. धुळे शहर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी पार्टी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे..
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिलाल माळी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे. साक्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे मोहन सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे. शिरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे.
नंदुरबार जिल्हा
महायुती १
महाविकास आघाडी ०
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील फक्त एका मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाले आहे
१ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ
महायुतीच्या नेत्यां भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केले आहे
महायुती बंडखोरी आणि मैत्रीपूर्ण लढाई -
अहिल्यानगर ( उत्तर नगर जिल्हा )
श्रीरामपुर विधानसभा -
राष्ट्रवादी अजीत पवार पक्षाचे लहू कानडे तर शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे हे निवडणुक मैदानात आहेत त्यामुळे महायुतीत दुफळी निर्माण झाली असुन या मतदारसंघात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.कानडे आणि कांबळे या दोघांना पक्षाचे एबी फॉर्म दिले आहेत माघारीच्या दिवशी अर्ज माघारी न घेतल्याने मरायुतीत पेच निर्माण झाला...दोन्ही उमेदवार आपल्या प्रचारात व्यस्त आहेत..तर कॉंग्रेसकडून हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आलीय...
नेवासा विधानसभा -
नेवासा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे यांनी बंडखोरी केलीय....ते प्रहारकडून निवडणुक मैदानात आहेत...तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळाली आहे.बंडखोरीचा फायदा ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना होवू शकतो त्यामुळे महायुतीत डोकेदुखी वाढली आहे.
अकोले विधानसभा -
अकोले विधानसभा मतदारसंघात अजीत पवार गटाकडून विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे , शरद पवार गटाकडून अमित भांगरे हे उमेदवार आहेत...भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने आणि प्रचाराचा धडाका सुरू केल्याने किरण लहामटेंची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अहिल्यानगर (दक्षिण)
श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादी (SP) माजी आमदार राहुल जगताप यांनी बंडखोरी केली त्यामुळे मविआची अडचण झाली आहे...तिथे शिवसेना ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे उमेदवार आहेत. पारनेरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडखोरी केली. पारनेरमध्ये राष्ट्रवादी (SP) च्या राणी लंके या उमेदवार आहेत. शेवगाव-पाथर्डीत राष्ट्रवादी (AP) चे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी बंडखोरी केली त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार भाजपच्या आ. मोनिका राजळे या आहेत.
आणखी वाचा