एक्स्प्लोर

दहा वर्षे एकमेकांचं तोंड न पाहणाऱ्या बारणे-जगताप यांच्यात अखेर मनोमिलन

दोघांनी एकमेकांना पेढा भरवत पत्रकार परिषदेचा समारोप केला. विजयात अडसर ठरणाऱ्या लक्ष्मण जगताप यांची नाराजी दूर झाल्याने श्रीरंग बारणेंच्या जीवात जीव आला आहे.

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभेत भाजप-शिवसेना युतीत अखेर मनोमिलन झालं आहे. गेली दहा वर्षे एकमेकांचं तोंड न पाहणारे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप चक्क एकाच गाडीतून आले. यानंतर बारणे-जगताप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत वादावर पडदा टाकला. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी हे मिलन घडवलं. रविवारी (7 एप्रिल) रात्री महाजन आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी बारणे आणि जगताप यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दोघांचं फोनवरुन बोलणं झालं. त्यानंतर त्यांचं मनोमिलन घडलं. स्वतः श्रीरंग बारणे लक्ष्मण जगताप यांच्या घरी गेले. नंतर शिवसेना खासदार संजय राऊत, मंत्री गिरीश महाजन यांनी दोघांच्या बैठका घेतल्या होत्या. पण जगतापांची नाराजी दूर होत नव्हती. अखेर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघांनाच यात लक्ष घालावं लागलं. दोघांशी बोलणं होताच जगतापांनी वैर मागे टाकले आणि पत्रकार परिषद घेत तशी घोषणा केली. पत्रकार परिषदेला तर बारणे-जगताप एकाच गाडीतून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नंतर तर हातात हात घेऊन पत्रकारांसमोर आले, अन् सर्वच अचंबित झाले. आजवर केलेले सर्व आरोप मागे घेत, हे केवळ राजकीय वितुष्ट होते, असं बारणे म्हणाले. तर राजकारणात मतभेद असावेत, मनभेद नाही, याच तत्वावर आम्ही एकत्र आलो आहे. पक्ष महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळेच आमचे स्वार्थ आम्ही बाजूला ठेवले आहेत, असं जगताप यांनी स्पष्ट केलं. दोघांनी एकमेकांना पेढा भरवत पत्रकार परिषदेचा समारोप केला. विजयात अडसर ठरणाऱ्या लक्ष्मण जगताप यांची नाराजी दूर झाल्याने श्रीरंग बारणेंच्या जीवात जीव आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
Embed widget