एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rohit Pawar: भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 'या' महिला नेत्यांच्या नावाची चर्चा? रोहित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Rohit Pawar: राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे.

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं असलं तरी कोण होणार याबाबतचं उत्तर गुलदस्त्यात आहे. अनेक नावांची चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच महिला मुख्यमंत्री होण्याच्याही चर्चा रंगताना दिसत आहेत. या महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्ली महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं म्हंटल आहे. तर महिला मुख्यमंत्र्याच्या बाबतीत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या अशा जागा आल्यात की,अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे अशी सध्याची स्थिती आहे. मात्र, या गोष्टी दोघांना माहीत असल्याने त्यांना भाजपचं ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे ठरलेलं आहे, पण पंकजा मुंडे यांना देखील मंत्रीपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे, बघुयात काय होतं असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

तर राज्यातील मंत्रीमंडळात देखील महिलांची संख्या वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मंत्रीमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे. मंत्री पदासाठी या महिला आमदारांची नावे चर्चेत आहेत.
1) अदिती तटकरे
2) पंकजा मुंडे
3) मनीषा कायंदे
4) माधुरी मिसाळ
5) भावना गवळी
6) देवयानी फरांदे
7) श्वेता महाले

महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार? 

महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू आहे. पहिली पसंती शिवाजी पार्कला देण्यात आली आहे, तर रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवनचेही पर्याय समोर आहेत.राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मनसेची सभा झाली नव्हती, त्यामुळं शिवाजी पार्कवर सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळं तिथं शपथविधी करण्याची जादा शक्यता आहे. तसंच 6 डिसेंबरच्या तयारीत अडथळा नको म्हणून इतर ठिकाणांचाही विचार सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Embed widget