एक्स्प्लोर
धुळे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये
भाजपचेच आमदार असलेल्या अनिल गोटे यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले. त्यांनी 'लोकसंग्राम' या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष 57 असे 59 उमेदवार उभे केले. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आलं.
धुळे : धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.
धुळे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्यं
1. धुळे महानगरपालिकेच्या प्रचारात तीन दिग्गज मंत्री उतरले होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली.
2. शहरातील वाढती गुंडगिरी, शहराला आठ दिवसांतून एकदा मिळणारं पाणी आणि धुळे शहराचा विकास या भवती निवडणुकीचा प्रचार फिरला.
3. भाजपचेच आमदार असलेल्या अनिल गोटे यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले. त्यांनी 'लोकसंग्राम' या पक्षाच्या चिन्हावर दोन, तर अपक्ष 57 असे 59 उमेदवार उभे केले. पण त्यांना केवळ आपल्या पत्नीला विजयी करता आलं. त्यांच्या मुलगा तेजस गोटे यांचाही पराभव झाला. मतदारांनी गोटे यांना नाकारलं.
4. भाजपविरोधात केलेल्या छुप्या युतीचा फायदा झाला नाही. लोकसंग्राम, शिवसेना आणि मनसे यांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता, मात्र त्याचाही उपयोग या निवडणुकीत झालेला दिसत नाही.
5. भाजपला 74 जागांपैकी मुस्लिमबहुल भागांमध्ये 12 ठिकाणी उमेदवारच मिळाले नव्हते. तरीही 62 जागांपैकी त्यांच्या 49 जागा निवडून आल्या आणि पालिकेत स्पष्ट बहुमत मिळालं.
6. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम, संभाजी ब्रिगेड यांनी पहिल्यांदाच नशीब आजमावले. यात एमआयएमला तीन जागी यश मिळालं आणि त्यांची पालिकेत एन्ट्री झाली.
7. आमदार अनिल गोटे यांना जनतेने नाकारले. गोटे यांनी महानगरपालिकेच्या प्रचारात भाजप हा गुंडांचा पक्ष आहे. गुंडांना निवडून देऊ नका, असं आवाहन केलं. स्वतःच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सामान्य मतदारांनी गोटे यांना नाकारलं.
8. धुळे महापालिकेच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच पूर्णपणे बहुमत मिळालं. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे केवळ तीन नगरसेवक होते. आता त्यांच्या नगरसेवकांची संख्या असेल 49.
9. ऑडिओ-व्हिडिओ क्लिपचा वापर करुन सोशल मीडियाद्वारे लोकसंग्राम भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या पाहायला मिळाल्या.
10. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच 'नोटा' या बटणावर मतदान करणाऱ्यांचं मत ग्राह्य धरलं गेलं. मात्र लोकांनी नोटा ऐवजी उमेदवारालाच मतदान केल्याचं निवडणूक निकालातून स्पष्ट झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement