एक्स्प्लोर

धुळ्यात भाजपची सत्ता, अहमदनगरमध्ये शिवसेना-आघाडीत रस्सीखेच

धुळे-अहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : दोन्ही महापालिकांसाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान पूर्ण झालं. हाती आलेल्या आकडेवारीनुसार अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान पार पडलं. तर धुळ्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली.

धुळे/अहमदनगर : राज्याचं लक्ष लागून असलेल्या धुळे आणि अहमदनगर महापालिकांचा चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती बाजी मारली आहे. 74 जागांपैकी भाजपने 50 जागांवर यश मिळवलं आहे. तर अहमदनगरकरांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23, शिवसेना 24 आणि भाजप 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली. भाजपने 49, काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने नऊ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने तीन जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. अहमदनगरमध्ये आघाडी-शिवसेनेत काँटे की टक्कर अहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 23 जागा, शिवसेना 24, भाजप 14 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सत्तास्थापनेसाठी अहमदनगरमध्ये शिवसेना आणि भाजपला आघाडी करावी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर निवडणुकीतला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम दोन हजार मतांनी विजयी झाला आहे. दरम्यान महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौरपदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचं चित्र दिसत आहे
  • अहमदनगर : शिवरायांविरोधात अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम 2000 मतांनी विजयी
    अनिल गोटे यांची मनस्थिती ठीक नाही, त्यांनी आराम करावा. त्यांच्या दोन जागा निवडून आल्या याचं मला आश्चर्य वाटतं : गिरीश महाजन
    धुळ्यामध्ये 50 प्लसचा नारा दिला होता, पण आकडे चुकले, तरीही धुळेकरानी आम्हाला बहुमत दिलं : गिरीश महाजन
    धुळेकरांचे आभार, अनिल गोटे भुईसपाट झाले आहेत, त्यांनी ते मान्य करावं : गिरीश महाजन
    अहमदनगरमध्ये आम्ही कमी पडलो, पण इथे युतीशिवाय सरकार स्थापन होणार नाही, मुख्यमंत्री, रावसाहेब दानवे निर्णय घेतील : गिरीश महाजन
    अहमदनगर : दिलीप गांधी यांचे पुत्र आणि सून दोघे पिछाडीवर
    अहमदनगर : श्रीपाद छिंदम 400 मतांनी आघाडीवर
    धुळ्यात एमआयएमने खातं उघडलं, चार उमेदवार विजयी
    धुळे : अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे 1500 मतांनी पिछाडीवर, तर पत्नी हेमा गोटे यांना 1000 मतांनी आघाडी
    अहमदनगर : शिवसेना 17, भाजप 18, आघाडी 25, इतर 8
    अहमदनगर : शिवसेना 19, भाजप 19, आघाडी 22, इतर 8
    धुळे : भाजप 37, आघाडी 14, लोकसंग्राम 3, शिवसेना 7 आणि इतर 2
    अहमदनगर - भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आघाडीवर, प्रभाग क्रमांक 11 'ड' मध्ये सुवेंद्र गांधी पुढे
    धुळे : मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची मोठी गर्दी, प्रत्येकाला निकालाची प्रतीक्षा
    अहमदनगर : केडगावमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले मनोज कोतकर 219 मतांनी आघाडीवर
    अहमदनगरमध्ये शिवसेना आणि भाजप दुसऱ्या स्थानावर तर धुळ्यात भाजप आणि आघाडीमध्ये चुरस
    अहमदनगर : भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या सून दिप्ती गांधी 160 मतांनी पिछाडीवर
    आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे (लोकसंग्रामच्या उमेदवार) प्रभाग क्रमांक ५ ब मधून 100 मतांची आघाडीवर भाजपच्या उमेदवार आणि गोटे यांचे विरोधक मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे दुसऱ्या क्रमांकावर
    अहमदनगरध्ये श्रीपाद छिंदम 300 मतांनी पिछाडीवर, प्रभाग 9 क मधून छिंदम मागे
    अहमदनगर : प्रभाग क्रमांक 2 मध्ये चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप पिछाडीवर
    अनिल गोटेंच्या पत्नी हेमा गोटे आघाडीवर
    अहमदनगर : शिवसेना 12, भाजप 20, आघाडी 12, इतर 3
    धुळे : भाजप 23, आघाडी 15, लोकसंग्राम 2 आणि इतर 1 जागी
    धुळे आणि अहमदनगरमध्ये भाजपची मोठी आघाडी, धुळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दुसऱ्या स्थानी, अहमदनगरमध्ये शिवसेना दुसऱ्या स्थानावर
  • धुळे : प्रभाग 14 मध्ये भाजपाचे चारही उमेदवार आघाडीवर
  • धुळे : भाजप 4,  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 1 जागी आघाडीवर
  • अहमदनगर : शिवसेना 5, भाजप 8, काँग्रेस-राष्ट्रवादी 5, इतर 3 जागी आघाडीवर
  • धुळे : भाजप 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 1 जागी आघाडीवर
  • धुळे : भाजप 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 1 जागी आघाडीवर
  • अहमदनगरमध्ये भाजपला दोन जागांवर आघाडी
  • धुळे महापालिकेचा पहिला कल हाती, भाजपला दोन जागांवर आघाडी
  • अहमदनगर - एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक अधिकाऱ्यासमोर चार टेबल, एकूण 24 टेबल, यातील 17 टेबलवर प्रभागनिहाय मतमोजणी होणार
  • धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
  • धुळ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात
  • धुळे महापालिकेतील एक जागा बिनविरोध, प्रभाग 12 'अ' मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड
------------ धुळे/अहमदनगर : एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच राज्याच्या नजरा धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीकडे आहे. धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही महापालिकांसाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान पूर्ण झालं. हाती आलेल्या आकडेवारीनुसार अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान पार पडलं. तर धुळ्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली. धुळ्यात भाजपला जास्त जागा? स्थानिक पत्रकारांनी दिलेला कल पाहता धुळ्यात स्वपक्षीयांनाच आव्हान देणारे अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षीत यश मिळणार नाही. तर भाजपला जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केला आहे. धुळे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्यं बहुमतासाठी 38 सदस्य संख्या ज्या पक्षाकडे, त्याची महापालिकेवर सत्ता 59.64 टक्के मतदान कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं भाजपचे तीन मंत्री, शिवसेनेच्या एका मंत्र्यासह दोन आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला हद्दवाढीनंतर प्रथमच दहा गावातील ग्रामस्थांनी बजावला महापालिका मतदानाचा अधिकार खरी चुरस भाजप विरुद्ध भाजप, तर शिवसेना, लोकसंग्राम आणि मनसे यांचा एकमेकांना पाठिंबा भाजपवगळता अन्य सर्व पक्षांचा गुंडगिरीमुक्त शहराचा नारा स्थानिक पत्रकार आणि मतदारांच्या अंदाजानुसार कोणत्या पक्ष किती यश मिळेल याची आकडेवारीही समोर आली आहे. नगरमध्ये विजय कोणाचा? दुसरीकडे अहमदनगरमध्ये कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सर्वसाधारण समाज जागा मिळण्याची शक्यता स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये मतदारराजा कुणाच्या पारड्यात विजयाचा कौल पाडतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल. अहमदनगर महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिला महापौर शिवसेनेचा आजपर्यंत महापालिकेवर कोणाचीही 5 वर्षे सत्ता नाही अडीच वर्षाच्या टर्मनंतर महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यातच भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेस युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीत जय्यत तयारी धुळेकरांचा कौल पक्ष                                   जागा लोकसंग्राम पक्ष                       5 भाजप                                   29 शिवसेना                                 7 काँग्रेस-राष्ट्रवादी                    28 इतर                                       5 एकूण                                74 अहमदनगरकरांचा कौल पक्ष                                              जागा शिवसेना                                           21 भाजप                                              20 राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी                  22 इतर                                                   5 एकूण                                           68 संबंधित बातम्या महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60 तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान Dhule Election Update : 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज Ahmadnagar Election Update : 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान अहमदनगर, धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला? महापालिका निवडणूक : श्रीपाद छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा महापालिका निवडणूक : धुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात महापालिका निवडणूक : अहमदनगरमध्ये मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव धुळे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत चुरस, उद्या मतदान आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात अहमदनगर महापालिका निवडणूक प्रचारात जादूटोणा? धुळे महापालिका निवडणूक : खरी चुरस भाजप विरुद्ध भाजप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget