एक्स्प्लोर
Advertisement
आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्कीत खाल्लेले पैसे शेतकऱ्यांना दिलेले बरे, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
वर्धा जिल्ह्याच्या आष्टी येथे काँग्रेस उमेदवार चारुलता टोकास यांच्या प्रचारार्थ सभेच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंडे यांनी पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांच्यासह सरकारवर सडकून टीका केली.
वर्धा : शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे. वर्ध्यात झालेल्या एका प्रचारसभेत ते बोलत होते.
मुंडे साहेबांचा वारस मी कधीच समजलं नाही. ते पंकजाताईनेच सांभाळावे. त्याचा त्यांनाच लखलाभ. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर सरकारचे घोटाळे बाहेर काढले नसते असा टोला धनंजय मुंडेंनी लगावाला. तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये आहात तेव्हा चौकशी समिती नेमावी असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केली केलं.
VIDEO | हिंमत असेल तर लोकसभा लढवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान | बीड | एबीपी माझा
वर्धा जिल्ह्याच्या आष्टी येथे काँग्रेस उमेदवार चारुलता टोकास यांच्या प्रचारार्थ सभेच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंडे यांनी पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांच्यासह सरकारवर सडकून टीका केली.
धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही, माझाच्या तोंडी परीक्षेत धनंजय मुंडेंची खंत
पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "राजकारणात येण्यापूर्वीचं माझं आणि बहिणीच नातं मला आवडतं. राजकारणात आल्यानंतर आमच्यात जे अंतर पडत गेलं ते व्हायला नको होतं. इतक्या वर्षात आता या नात्यात अंतर पडलं आहे. मला त्यांनी धनुदादा म्हणून हाक मारणं आता कानावर पडत नाही".
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement