फडणवीस म्हणाले, मला उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त करण्याची विनंती करणार; बावनकुळेंचाही मोठा निर्णय
BJP Press Conference : लोकसभेत भाजपला मिळालेल्या अपयशाला आपण कारणीभूत असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली.
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारमध्ये (Maharashtra Government) राहून सरकारला मदत करण्याची गरज, आमचा निर्णय फडणवीस मान्य करतील अशी अपेक्षा, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasehkhar Bawankule) यांनी बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या नेतृत्वात महायुतील महाराष्ट्रात 45 पेक्षा जागा मिळण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला 17 जागा मिळाल्या एकट्या भाजपला 10 जागाही मिळवता आलेल्या नाहीत. या अपयशाला आपण कारणीभूत असल्याचं सांगत फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरु आहे.
फडणवीसांची उपमुख्यमंत्री राजीनामा देण्याची इच्छा
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि विधानसभेसाठी संघटनेसाठी पूर्ण वेळ देण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. त्यांनी तशी भावना केंद्रीय नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. सरकारमध्ये काम करुनही आम्ही त्यांना विनंती केली आहे. संघटना आणि सरकारमध्ये सन्मान ठेवून सरकारमध्ये राहून काम करावं. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. केंद्राशी बोलेन मग पुढचा निर्णय घेईन, असं फडणवीस म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये बाहेर जाऊन नाही, सरकारमध्ये राहून संघटनेचं काम करावं.
बावनकुळेंचाही मोठा निर्णय
फडणवीस म्हणाले की, मला उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त करण्याची विनंती करणार आहे. यानंतर बावनकुळेंचाही मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारमध्येच राहून पक्षासाठी काम करतील, अशी विनंती केंद्रांकडे केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बावनकुळे म्हणाले, फडणवीसांनी सरकारमध्ये राहून सरकारला मदत करण्याची गरज, आमचा सर्वांचा निर्णय फडणवीस मान्य करतील अशी अपेक्षा असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांनी म्हटलं की, पुढच्या काळात देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजप आणि महायुतीला चांगलं यश मिळेल. त्यासाठी रोड मॅप आम्ही तयार करणार आहोत. मताची टक्केवारी कशी वाढेल. शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटतीय यावरही चर्चा केली.
विधानसभेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक
महाराष्ट्राच्या लोकसभेच्या पूर्ण 48 मतदार संघाच्या विधानसभेत विशेषकांची आणि निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी चर्चा केल्यावर आम्ही पुढे जाणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपला आणि महायुतीला चांगलं एक मिळेल, या दृष्टीने पंधरा दिवसांमध्ये आम्ही एक रोड मॅप तयार करणार आहोत.
चंद्रशेखर बानकुळे काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पूर्ण निवडणुकीसाठी पूर्ण वेळ देण्यासाठी केंद्राला विनंती केली आहे, ही देवेंद्र फडणवीस यांची त्यागाची भूमिका आहे. त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे. सरकारच्या बाहेर येऊन त्यांनी काम करण्याची गरज नाही. त्यांना सरकारमध्ये राहून देखील काम करता येईल. आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी सरकारमध्ये राहून आम्हाला प्रोटेक्शन द्यावं, असं बावनकुळे म्हणाले आहेत. आता फडणवीसाच्या मनधरणीचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न सफल होणार का फडणवीस वेगळा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.