देवेंद्र फडणवीसांचा 'धारावी'तून ठाकरेंवर निशाणा; आम्ही मोदींना आणतो म्हणत सांगितला 'पुढचा पॅटर्न'
Devendra Fadnavis : धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार असल्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलं आहे.
Devendra Fadnavis : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारावीत जाहीर सभा झाली. धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार असल्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलं आहे. धारावी बहुरंगी असून, इथं कलाकुसर, निर्मिती, आर्थिक इकोसिस्टिम आहे. कुंभारवाड्यात होणारे काम, चामड्यावर होणारं काम, फूड इंडस्ट्री असेल. उत्तम गोष्टी धारावीत तयार होतात असे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या 15 तारखेला मतदान आहे. कमळ आणि धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि उमेदवारांना निवडून द्या. 16 तारखेपासून आम्ही धारावीकरांची काळजी घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. धारावीत आपण सर्वांनी माझं भव्य स्वागत केलं याबद्दल मुख्यमंत्र्यांनी धारावीकरांचे आभार मानले.
धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार
अतिशय कष्टाळू आणि मेहनती लोकं इथे राहतात. धारावीबद्दल चर्चा मोठ्या व्हायच्या. पुर्नविकास व्हायला पाहिजे असं बोललं गेलं, मात्र 30 वर्ष निघून गेलेत असे फडणवीस म्हणाले. भाजप-शिवसेनेने धारावीचा पुर्नविकास सुरु केला आहे. धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार आहे. छोटं घर 350 चौ. फुटांचे असणार आहे. एसआरएच्या इमारती व्हर्टिकल झोपडपट्ट्या होत्या. मात्र, आता रिहॅबचे डिझाइन चांगले तयार केले आहेत. उत्तम सोय असेल, मेन्टेनन्स लागणार नाही अशा व्यवस्था असेल असे मुख्यमंत्री म्हणाले. धारावीचा विकास करताना गार्डन, मैदाने तयार करणार आहोत. धारावीतील व्यवसायावर ही धारावी उभी आहे. व्यवसाय आहे, त्यांना चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या जातील
इतक्या वर्षात विरोधकांनी काय केलं?
पुढचे 5 वर्ष अशा लोकांना राज्य सरकारचे कर माफ देखील आम्ही करणार आहोत. प्रत्येक अपात्रांना राहण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर देणार आहोत. पात्र आणि अपात्र देखील पुर्नविकास होईल. एक झोपडी काढायची आणि दुसरी तयार करायची असं आपल्याला करायचं नाही असे फडणवीस म्हणाले. धारावी कोणाला दिली नाही, ती कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नाही. डीआरपी, एसआरए हिस्सेदारी आहे. कोणी विकासक लाटेल असं होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. इतक्या वर्षात विरोधकांना विचारा, तुम्ही काय केलं? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. प्रत्येक धारावीकरांना आम्ही घर दिल्याशिवाय राहणार नाही. मोदीजींना आम्ही आणतो उद्घाटन आपण करुयात असेही फडणवीस म्हणाले. एआयडीएमकेनं भाजपला संपूर्ण समर्थन दिलं आहे, ते देखील प्रचारात उतरतील असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:





















