एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Maharashtra CM: गावगाड्याचे रक्षणकर्ते ते बहुजन उद्धारक, शिवभक्त ते गरिबांचे हृदयसम्राट, फडणवीसांना कोण कोण काय म्हणालं?

Devendra Fadnavis Maharashtra CM: भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली.

Devendra Fadnavis Maharashtra CM मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अखेर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अनुमोदन देताना भाजपच्या आमदारांनी विविध विशेषणं वापरली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. तर सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे, शिवभक्त असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचं पुढे नाव घेतलं. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अनुमोदन देताना कोणी कोणती विशेषणं वापरली, पाहा...

प्रस्तावाला अनुमोदन देताना देवेंद्र फडणवीसांसाठी वापरलेली विशेषणं- 

चंद्रकांतदादा पाटील - आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक
सुधीर मुनगंटीवार - छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे, शिवभक्त 
मेघना बोर्डीकर - नव महाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या देवेंद्र
गोपीचंद पडळकर - या राज्याचे, गावगाड्याचे रक्षणकर्ते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरिब उपेक्षितांचे हृदयसम्राट
दिलीप बोरसे - महाराष्ट्राच्या आदिवासींचे नेते
आशिष शेलार - समस्त मुंबईकरांच्यावतीने

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील भाजपच्या कार्यालयात जल्लोष-

भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला  प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांनी अनुमोदन दिले. यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होताच विधिमंडळात 'देवाभाऊ'च्या घोषणा देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)

  • महायुती- 237
  • मविआ- 49
  • अपक्ष/इतर - 02
    ---------------------
    एकूण - 288

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)

भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 
अपक्ष- 2

एकूण 288 

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137 

विधिमंडळातील संपूर्ण VIDEO:

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis Maharashtra CM: आनंद आहेच पण जबाबदारी वाढलीय, पहिल्या भाषणात दूरदृष्टीची झलक,देवेंद्र फडणवीसांचे टॉप 10 मुद्दे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत हत्या, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत हत्या, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
Astrology : आज सोमवती अमावस्येच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
आज सोमवती अमावस्येला जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
Maharashtra Weather: येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
Horoscope Today 30 December 2024 : आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaWalmik Karad Beed : सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड शरण येणार?ABP Majha Headlines :  7:00 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत हत्या, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत हत्या, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
Astrology : आज सोमवती अमावस्येच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
आज सोमवती अमावस्येला जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
Maharashtra Weather: येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
Horoscope Today 30 December 2024 : आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
Mhada News: म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालांवर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणीचा आरोप, पण म्हाडाची काऊंटर ॲक्शन, नेमकं काय घडलं?
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Embed widget