Dapoli Vidhansabha Election : योगेश कदम वि. संजय कदम, नाव साधर्म्य असलेले 6 उमेदवार रिंगणात, कुणाची डोकेदुखी वाढणार?
Dapoli Vidhansabha Election : दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम नावाच्या 3 आणि संजय कदम यांच्या नावाच्या तीन जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Dapoli Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) तिन्ही पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये एकमेकांसमोर असणार आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष 148 जागा लढणार आहे. तर शिंदेंची शिवसेना 80 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 53 जागा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात जास्त जागा लढवताना दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाने 102 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 96 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 86 जागा लढवत आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला 2 आणि शेकापला 2 जागा देण्यात आल्या आहेत.
दापोली मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. दापोली मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संजय कदम यांना संधी दिली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार आणि रामदास कदम यांचे सूपुत्र योगेश कदम यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, या निवडणुकीत एकाच नावाचे तीन उमेदवार असल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. शिवसेनेच्या उद्धव गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले दोन संजय कदम अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल आहेत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या योगेश रामदास कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेले दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीत उभ्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवसेनेच्या उद्धव गटाकडून
संजय वसंत कदम ( उध्दव गट)
संजय संभाजी कदम(अपक्ष)
संजय सिताराम कदम (अपक्ष)
तर शिंदेंच्या शिवसेनेकडून
योगेश रामदास कदम (शिंदेंची शिवसेना)
योगेश रामदास कदम (अपक्ष)
योगेश विठ्ठल कदम (अपक्ष)
असे उमेदवार रिंगणात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंचा धमाका, अजित पवारांच्या दोन उमेदवारांविरुद्ध हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले!