एक्स्प्लोर
काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; अशोक चव्हाण, माणिकरावांचं तिकीट पक्कं?
खरंतर नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती. तर अशोक चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची नावं नक्की झाल्याचं कळतं. अशोक चव्हाण नांदेड तर माणिकराव ठाकरे यवतमाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असं म्हटलं जात आहे.
खरंतर नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती. तर अशोक चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. परंतु विद्यमान खासदाराने निवडणूक लढवावी, प्रदेशाध्यक्षाने निवडणूक लढवत नाही तर चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेस अध्यक्षांचा होता.
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार
या सहा जणांना उमेदवारी?
नांदेड - अशोक चव्हाण
वर्धा - चारुलता टोकस
अकोला - डॉ. अभय पाटील
रामटेक - निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये
धुळे - कुणाल पाटील
यवतमाळ - माणिकराव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement