एक्स्प्लोर
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला पहिला मराठी अध्यक्ष मिळणार? आज फैसला
नवा अध्यक्ष निवडण्यासंदर्भात आज दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु आहे. 25 मे रोजी राहुल गांधींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीत राजीनामा दिला, त्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडत आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यानंतर पहिला मराठी अध्यक्ष मिळण्याची शक्यता वाढली आहे. नवा अध्यक्ष निवडण्यासंदर्भात आज दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु आहे. त्यात महाराष्ट्राचे मुकूल वासनिक आणि कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे या दोन दलित नेत्यांचं नाव समोर आलेलं आहे. 25 मे रोजी राहुल गांधींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीत राजीनामा दिला, त्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडत आहे. आज सकाळी आणि नंतर रात्री आठच्या दरम्यान अशी दोन टप्प्यांत ही बैठक होत आहे. या बैठकीनंतर आजच नव्या अध्यक्षाचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे.
मुकूल वासनिक हे 59 वर्षांचे आहेत तर मल्लिकार्जुन खरगे 77 वर्षांचे आहेत. मुकूल वासनिक हे सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्या निष्ठावंत वर्तुळातले मानले जातात. वासनिक 25 व्या वर्षीच पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते. काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी आतापर्यंत चारवेळा ते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत.
सगळ्या नेत्यांचं आजही राहुल गांधींनाच साकडं
काँग्रेस वर्किंग कमिटी मात्र सहजासहजी राहुल गांधी यांना अध्यक्षपद सोडू द्यायला तयार नाही. आज ज्योतिरादित्य शिंदेंसह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशी विनंती केली. तुम्ही काय करायला चालले आहात, याची तुम्हाला कल्पना नाही, अजून चार तास या गोष्टीवर विचार करा असं ज्योतिरादित्य शिंदे आपल्या मनोगतात राहुल गांधीना उद्देशून म्हणाले. तर इतरही अनेक नेत्यांनी याचीच री ओढली. अर्थात राहुल गांधी यांनी मात्र पुन्हा ठाम नकार दिला. मी कुठल्याही जबाबदारीपासून पळत नाही. नवीन अध्यक्ष आल्यानंतर उलट मी पहिल्यापेक्षा अधिक काम पक्षासाठी करत राहेन असा विश्वास राहुल गांधी यांनी आज नेत्यांना दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement