एक्स्प्लोर
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सस्पेन्सवर पडदा
सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियांका लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रियांका काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून मैदानात उतरणार नसल्याने सोनिया गांधी पुन्हा याच जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.
लखनौ : प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणार का? या प्रश्नावरील सस्पेन्सवर अखेर पडदा पडला आहे. आपण निवडणूक लढवणार नसल्याचं प्रियांका गांधींनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशात पक्षबांधणीवर भर देऊन 2022 मधील विधानसभा निवडणुका जिंकण्याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं प्रियांका गांधींनी सांगितलं.
मातोश्री सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियांका लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रियांका काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून मैदानात उतरणार नसल्याने सोनिया गांधी पुन्हा याच जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.
प्रियांकांनी लखनौ आणि फुलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. रिता बहुगुणा जोशींनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर लखनौमध्ये काँग्रेसकडे प्रबळ दावेदार नाही. फुलपूरच्या जागेवरुन जवाहरलाल नेहरु काँग्रेसची जागा लढवत असल्याने तो काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो.
उत्तर प्रदेशातील भाजपकडून अद्याप प्रियांका गांधींविषयी कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि 2012 च्या निवडणुकांमधील कामगिरीवर त्यांना घेरण्याचा भाजपचा इरादा आहे.
प्रियांका गांधी यांनी व्हॉट्सअॅप नंबर शेअर करत एक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपचं नाव आहे 'चौपाल'. हा ग्रुप जॉईन करुन कार्यकर्त्यांनी ग्राऊण्ड लेव्हलची माहिती त्यावर पोस्ट करावी, असं प्रियांकांनी सांगितलं आहे. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन त्या चौपाल (छोट्या बैठका) घेणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement