एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कोण पेरतंय हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखा माणूस कसं पेरणार? माझ्या जातीला कोण विचारतंय? असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात गेल्या 5 वर्षात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर बोलता येत नाही. मात्र  वेळ पडल्यास नक्की बोलेन असेही मुख्यमंत्री म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. VIDEO | राष्ट्रवादीकडून जातीयवादाचं विष, शरद पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर | एबीपी माझा सगळ्यांना माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात जातीयतेचे विष कोण पेरतंय  हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखा माणूस कसं पेरणार? माझ्या जातीला कोण विचारतंय? असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पण मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा-ओबीसी संघर्ष पेटविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाला सांभाळलं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, हे वारंवार जनतेच्या मनावर ठसवलं, तर द्वेष निर्माण होईल असं शरद पवारांना वाटतं, असा घणाघातही फडणवीसांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही शरद पवार चालवत आहेत, असं दिसतंय, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादीने कशी वागणूक दिली हे धनगर समाजाने पाहिलं, त्यांचा आमच्यावर विश्वास असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, या विधानावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील जोरदार टीका केली आहे. शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यावर लोकांना माहिती असतं त्यामागे ते काय म्हणतात. शिरुरचा उमेदवार देतांना मातीचा की जातीचा विचार केला होता? असा सवाल करत जातीच्या आधारावर आता मतं मिळणार नाहीत, हे शरद पवारांना कळायला लागलंय, असा टोला तावडे यांनी लगावला आहे. सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते बाहेर राहिले नसते : मुख्यमंत्री जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षर्थ नेते बाहेर राहिले नसते, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये उत्तर देताना केला. मनसे आता उनसे म्हणजे 'उमेदवार नसलेली सेना' झाली आहे, असा घणाघातही फडणवीसांनी केला. तर शरद पवार हे राज्यात जातीभेदाचं विष पसरवत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. जर सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते राहिले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता, असं म्हणत फडणवीसांनी दबावतंत्राचा आरोप फेटाळून लावला. जीएसटीमुळे भ्रष्टाचार बंद झाला आणि सरकारी तिजोरीत पैसा आला. त्यामुळे तो सर्वसामान्य, शेतकरी यांच्यापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या घोषणा भाजपने कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कुठून येणार? हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. मात्र भाजप जबाबदार पक्ष आहे. आम्ही सत्तेत येणारच आहोत. त्यामुळे शब्द देताना तरतूद करावीच लागेल. संवेदनशील पंतप्रधानाने समाजाची गरज ओळखून केलेलं संवेदनशील घोषणापत्र, अशा शब्दात फडणवीसांनी भाजपच्या संकल्पपत्राचं वर्णन केलं. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोललेच नव्हते, असा दावा फडणवीसांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला. कोणतीही व्हिडिओ क्लीप किंवा भाजपचं संकल्पपत्र काढून बघा, असं खुलं आव्हानही फडणवीसांनी दिलं. भाजपने दिलेल्या 540 आश्वासनांपैकी 520 पूर्ण झाली आहेत, तर 20 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असंही ते म्हणाले. राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. बालाकोटचा पुरावा मागणाऱ्यांना देशद्रोही म्हटलंच नाही. मात्र सैन्याने दिलेल्या माहितीवर आतापर्यंत कोणी अविश्वास दाखवला नव्हता, असं फडणवीस म्हणाले. राज ठाकरे पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड आहेत. मनसे आता उनसे झाली आहे. उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना, अशी टीकाही फडणवीसांनी केली. राज ठाकरे हे वाट चुकलेले नेते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वर्णन केलं. शिवसेना-भाजपमध्ये अनेक कुरबुरी झाल्या, कलगीतुरे रंगले, मात्र विकासाच्या मुद्द्यावर कायमच एकमत झालं. शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होते, मात्र कधीच एकमेकांपासून दूर गेलो नाही, असा दावाही फडणवीसांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफJOB Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदावर जागा? 09 March 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 March 2025 : 08 March 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 09 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
Embed widget