एक्स्प्लोर
Advertisement
निवडणूक पथकात हजर न झालेल्या चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नियुक्तीनंतर नोटीस देऊनही हजर न झाल्याने कारवाई
परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या पथकात हजर न झाल्याने शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात चार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे निवडणूक काळात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या पथकात हजर न झाल्याने शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात चार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे निवडणूक काळात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता शिंदे यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार मंदार इंदुरकर यांनी पोलीस निरीक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी स्थायी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
माजलगाव कालवा क्रमांक 10 चे शाखा अभियंता डी एन श्रीवास्तव, ए.बी.गारडी, सहाय्यक अभियंता व्ही.व्ही पाटील आणि उपविभागीय मृद पाणी संवर्धन विभागातील कनिष्ठ लिपिक व्ही.आर जुकटे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र हे चारही अधिकारी या पथकामध्ये रुजू झाले नाही. त्यामुळे निवडणूक कामात कसूर केल्याच्या कारणावरून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 29 आणि 10 तसेच लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये या चौघां विरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement