एक्स्प्लोर
चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी 'चड्डी'वरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना 'चड्डी'वरुनच प्रत्युत्तर दिले आहे.
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खाकी 'चड्डी'वरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना 'चड्डी'वरुनच प्रत्युत्तर दिले आहे. आज (रविवार, 21 एप्रिल) सोलापुरातल्या कुर्डूवाडीत झालेल्या भाजपच्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, "ज्या चड्डीवरुन तुम्ही बोलत आहात, त्याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात, हे विसरु नका."
VIDEO | प्रचाराच्या नादात राजकारण 'चड्डी'पर्यंत घसरलं! | सोलापूर | एबीपी माझा
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज संपला. परंतु यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रचाराची पातळी घसरल्याचे पाहायला मिळाले. विजयसिंह मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी अकलूजमध्ये झालेल्या सभेत मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली होती. शरद पवार मोहिते पाटलांना म्हणाले होते की, "भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?
पवारांच्या वक्तव्याचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, "याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला होतात. 23 मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल की, कोणाची चड्डी उतरते."
VIDEO | आता संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, शरद पवारांचं मोहिते-पाटलांवर टीकास्त्र | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement