एक्स्प्लोर
पालघरमध्ये एका महिलेचे 68 वेळा मतदारयादीत नाव, यादीत हजारो बोगस नावं असल्याचा शिवसेना, बविआचा आरोप
संशयीत मतदान केंद्रावर अतिरिक्त अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच विशेष लक्ष ठेवून, वेब कास्टिंगद्वारे या मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहे.
पालघर : पालघर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. दरम्यान मतदानाच्या आधी शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने मतदार यादीमध्ये हजारो नाव बोगस असल्याचा आरोप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला आहे.
बविआने 60 हजार मतदारांची नावे दुबारा आल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेने 56 हजार मतदारांची दोनदा नावे असल्याचा आरोप केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच महिलेचे 68 वेळा मतदारयादीत नाव असल्याचं देखील निदर्शनास आलं आहे.
शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीची चिरफाड करून बोगस मतदार असल्याचं सांगितलं आहे. या यादीत 56 हजार मतदारांची दोन वेळा तर इतर हजारो मतदारांची तीन, चार, पाच वेळा नावे आली आहेत.
VIDEO | मतदार यादीत अनेक घोळ, पोलिंग बूध एजंट्ससोबत खास बातचीत | मुंबई | एबीपी माझा
धक्कादायक बाब म्हणजे सुरेखा सुरेश पाटील या महिलेचे तब्बल 68 वेळा नाव मतदार यादीत आले आहे. ही गंभीर बाब शिवसेनेने निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास पुराव्यासह आणून दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील बोईसर नालासोपारा, वसई, पालघर नगर परिषद हद्दीतील 282 आणि 283 ही मतदान केंद्रांसह मतदारसंघात हजारो बोगस मतदारांची नावे सामाविष्ट करण्यात आली असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली. संशयीत मतदान केंद्रावर अतिरिक्त अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच विशेष लक्ष ठेवून, वेब कास्टिंगद्वारे या मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात बविआचे बळीराम जाधव आणि महायुतीचे राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत आहे. या निवडणुकीत आजी-माजी खासदार एकमेकांविरुद्ध लढत आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात तीन आमदार बविआचे तर दोन भाजप आणि शिवसेना एक असे बलाबल आहे. तर वसई -विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement