एक्स्प्लोर

Eknath Shinde : महायुतीला मुंबई महापालिकेत काठावरचं बहुमत, एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढली, मुंबईत महापौर कोणाचा होणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागांवर विजय मिळवला आहे.

BMC Election 2026 मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे.  ठाकरेंच्या संपर्कामुळं शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतील ताज लँडस मध्ये ठेवण्यात आले आहेत. ठाकरेंच्या हालचालींमुळं शिंदेंना धोका किंवा संधी मिळेल, अशा चर्चा सुरु आहेत. बार्गेनिंग पॉवर वाढल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे महापौर पदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. स्थायी समितीसह इतर समित्यांसाठी देखील शिवसेना आग्रही  राहू शकते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून येत आहे.   

एकनाथ शिंदे मुंबई महापौरपदाची मागणी करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची गरज आहे. भाजपकडे सध्या 89 नगरसेवक आहेत तर शिदेंच्या शिवसेनेकडे 29 जागा आहेत. मुंबई महापालिकेत 227 जागा असल्यानं बहुमतासाठी 114  संख्याबळ आवश्यक आहे. यामुळं भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज असल्याचं दिसून येतं. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्यानं या कालावधीत मुंबईचं महापौरपद शिवसेनेकडं असावं अशाही चर्चा आहेत. 

मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 92 जागा लढल्या होत्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 89 नगरसेवक मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक विजयी झाले आहेत. मनसेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला 24 जागा मिळाल्या तर एमआयएमला 8 आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. 

संजय राऊत काय म्हणाले?

मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो, असं संजय राऊत म्हणाले. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले.  अनेकांशी चर्चा सुरु आहे, आम्ही तटस्थपणे हालचालींकडे पाहत आहोत, पडद्यामागं बऱ्याच घडामोडी घडताहेत. तुमचं बहुमत किती मोठं असो किंवा छोटं असुद्यात बहुमत हे चंचल असतं. तुम्ही नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार आहात. तुमचे नगरसेवक मूळचे शिवसेनेचे आहेत, आम्हाला जे संदेश येत आहेत त्यांच्या मनात मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगती आहे. भाजपचा महापौर व्हायचा नाही हे सर्वांनी ठरवला आहे. तुम्ही नगरसेवकांना कोंडून ठेवलं असलं तरी संदेश येत असतात, असं संजय राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget