एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमित शाहांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरेंची हजेरी
गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे.
गांधीनगर : जोरदार शक्तीप्रर्शन करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित शाहांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
अमित शाह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी शुभ मुहूर्ताची निवड केली होती. गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शाहांनी कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर नारणपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तिथे त्यांच्यासह इतर नेत्याची उपस्थितांना संबोधलं. मग अमित शाहांनी एनडीएमधील घटकपक्षांच्या नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चार किमीचा भव्य रोड शो केला.
रोड शो आधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, "1982 मी इथे बूथ कार्यकर्ता म्हणून नारणपुरा परिसरात पोस्टर आणि पत्रकं चिटकवत होतो आणि आज पक्षाचा अध्यक्ष आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, ते भाजपने दिलं आहे. आज निवडणूक केवळ याच गोष्टीवर लढवली जात आहे की, देशाचं नेतृत्त्व कोण करेल? देशाच्या कानाकोपऱ्यातून मोदी-मोदी आवाज येत आहे. मोदी निश्चितच देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की, गुजरातच्या सर्व 26 जागा मोदींना द्या आणि त्यांना पंतप्रधान बनवा."
भाजपचा बालेकिल्ला गांधीनगर
गांधीनगर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे इथले विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेलं गांधीनगर मतदारसंघ हा भाजपसाठी कायमच विजयाची हमखास गॅरंटी असा आहे. भाजपने 1989 पासून या जागेवर विजय मिळवला आहे. गांधीनगरच्या जागेसाठी पहिल्यांदा 1967 मध्ये निवडणूक झाली होती आणि तिथे काँग्रेसचा विजय झाला होता. यानंतर 1971 च्या निवडणुकीत काँग्रेस, 1977 मध्ये जनता दल आणि 1980 मध्ये काँग्रेसला विजय मिळाला.
1989 च्या निवडणुकीत शंकर सिंह वाघेला यांनी गांधीनगर मतदारसंघावर ताबा मिळवला. तेव्हापासून आतापर्यंत या जागेवर भगवा फडकत आहे. 1991 मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि 1996 मध्ये माजी मुख्यमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी या जागेवर विजय मिळवला होता. यानंतर 1998 पासून लालकृष्ण अडवाणी यांनी गांधीनगरचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागेवर अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वयोमानामुळे लालकृष्ण अडवाणी अमित शाहांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार नाही, असं भाजपच्या एका मंत्र्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement