नील तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का? किरीट सोमय्यांचा खोचक टोला, म्हणाले 16 तारखेला मविआतील सर्व पक्ष संपलेले असतील
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 107 मधून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यावेळी नील सोमय्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण विरोधी पक्षाने कुठलाही उमेदवार दिलेला नाही. या वॉर्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. तर दुसऱ्या बाजुला ठाकरे बंधुंनी या वॉर्डमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळं आता नील सोमय्यांच विजय निश्चित मानला जात आहे. यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी नीलला विचारलं तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का? असा खोचक टोला सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या?
नील सोमय्या यांना भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 107 मधून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यावेळी नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. कारण त्यांच्या विरोधातील शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. यावरुन बोलताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला टोला लगावला. . मी नीलला विचारलं तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का? असा खोचक टोला सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मविआचा एकही उमेदवार तिथे टिकला नाही. 16 तारखेला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष संपलेले असतील असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा नील 2017 साली पहिल्यांदा मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून निवडून आला. आता दुसऱ्यांदा पुन्हा भाजपच्या तिकीटावर नील सोमय्या रिंगणात आहे. विरोधी पक्षाचा एकही उमेदवार नाहीय. मुलुंड विधानसभा क्षेत्रात सहावॉर्ड आहेत. फक्त 107 वॉर्ड सोडून पाच वॉर्डात अन्य पक्षांचे उमेदवार आहेत.
ठाकरे बंधुंनी का उमेदवार दिला नाही?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकही उमेदवार वॉर्ड क्रमांक 107 मधून उतरवलेला नाही. कारण ही जागा त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडली होती. ठाकरे बंधु आणि शरद पवार यांच्या पक्षाची आघाडी आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हंसराज दानानी यांना 107 वॉर्डातून उमेदवारी दिलेली. दानानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. एनसीपी उमेदवाराचा अर्ज यासाठी फेटाळण्यात आला, कारण त्याने उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिलं नाही. आता किरीट सोमय्या यांच्या मुलाचा विजय पक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:





















