मताच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Devendra Fadnavis : इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आज अभिनव प्रकारची सभा म्हणू की रोड शो म्हणू की पत्रकार परिषद म्हणू असा प्रश्न पडला आहे. या ठिकाणी आपण जलशुद्धी प्रकल्प, रस्ते प्रकल्प आपण केले आहेत. आमदार, खासदार यांच्या प्रयत्नातून मलनिस्सारण प्रकल्प उभा राहिला आहे. सरकार आणि नगरपालिकीचे माध्यमातून ही कामे केली असल्याचे फडणवीस म्हणाले.
आम्ही जे केलंय आणि करणार आहोत यावर मतं मागायला आलो आहोत
आम्ही जे केलंय आणि करणार आहोत यावर आम्ही मतं मागायला आलो आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी निधी दिला आहे. 70 वर्षात शहराच्या विकासासाठी निधी दिला जात नव्हता. आता निधी दिला आणि तो वापर करणारे योग्य व्यक्ती नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आम्ही इचलकरंजी शहराच्या पाठीशी उभे आहोत असे फडणवीस म्हणाले. त्यामुळं मताच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या. इचलकरंजी शहरासाठी वाटेल तितका निधी देऊ पण शहराचा पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.
15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या पुढचे पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ
इचलकरंजीत महायुतीची रॅली आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या रोड शो च्या माध्यमातून जो आशीर्वाद दिला आहे त्याच्या दुप्पट निधी आम्ही या शहराला देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या 15 तारखेला आपण मतदानाला बाहेर पडून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले. 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या पुढचे पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ असेही ते म्हणाले. महानगरपालिकेच्या निवडणुकीला कालपासून खरी सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. कुठं युत्या तर कुठं आघाड्या झाल्या आहेत. काही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.
महत्वाच्या बातम्या:




















