एक्स्प्लोर

Chandrapur Election 2026 Result: मोठी बातमी : इकडे मुंबईत महापौरपदावरुन घमासान, तिकडे सुधीरभाऊ म्हणाले, ठाकरे गटाशी चर्चा, चंद्रपुरात मोठ्या घडामोडी

Chandrapur Election 2026 Result: शिवसेना ठाकरे गटाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर भाजप (BJP) विरोधी पक्षात बसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलीय.

Chandrapur Mahanagarpalika Election 2026 Results चंद्रपूर : शिवसेना ठाकरे गटाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर भाजप (BJP) विरोधी पक्षात बसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी घेतलीय. शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर त्यांनी हि रोखठोक भूमिका बोलताना व्यक्त केलीय. तुम्ही जर भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार असल्याचं अनेक नगरसेवकांनी म्हंटलं आहे, शिवसेना ठाकरे गटासोबत देखील 2 वेळा चर्चा झाली आहे, आणि पहिल्या भेटीतच महापौर पद कोणालाही देता येणार नाही, हे आम्ही शिवसेनेला स्पष्ट सांगितल्याचं आणि चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच करावा लागेल, असं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे. (Chandrapur Municipal Election)

Chandrapur Mahanagarpalika Election 2026: जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार

दुसरीकडे, जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत. असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्याव भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यात चर्चेची प्राथमिक फेरी झाली. शिवसेना उबाठा गटाने आमचा महापौर केल्यास भाजपसोबत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली आहे. शिवसेनेच्या या ऑफरमुळे काँग्रेसवर देखील दबाव वाढू शकतो.

शिवसेना उबाठा भाजपसोबत गेल्यास काँग्रेसचा हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप शिवसेना उबाठाला महापौर पद देणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलीय.

Chandrapur Municipal Election: चंद्रपुरात भाजपच्या माजी महापौर- उपमहापौरांचा पराभव

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला मोठं यश आलं आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या होमपीचवर भाजपला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागतंय. अशातच, या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही माजी महापौर राखी कंचर्लावार आणि अंजली घोटेकर या देखील पराभूत झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे दोन्ही माजी उपमहापौर संदीप आवारी आणि अनिल फुलझले देखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे चंद्रपुरात भाजपला पुन्हा एका पराभवाला समोर जावं लागतंय. दुसरीकडे मात्र विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसचा गड राखलाय.

Chandrapur Election 2026 Results : महापालिका नाव - चंद्रपूर

पक्षनिहाय विजयी उमेदवार (16 प्रभागांचे निकाल घोषित)

भाजप - 23
शिवसेना - 1
काँग्रेस - 28
शिवसेना (उबाठा) UBT - 6
BSP - 1
वंचित आघाडी  - 1
MIM - 1
Independent - 2
NCP SP - 

NCP AP- 
MNS -

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
Embed widget