एक्स्प्लोर

भोसरी विधानसभा | भाजपच्या साथीनं लांडगेंचं ठरलंय, राष्ट्रवादीचं मात्र ठरेना

विद्यमान आमदार महेश लांडगे हेच इथून युतीचे उमेदवार असतील, पण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात कोण असेल? हे अद्याप ठरलेलं दिसेना. 2009 आणि 2014 साली मतदारांनी अपक्ष उमेदवाराला कल दिल्यानं त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये ही होईल, असा कयास काही इच्छुकांनी बांधलाय.

अपक्ष उमेदवारासाठी पोषक मतदारसंघ म्हणून भोसरी विधानसभेची ओळख आहे. 2009 आणि 2014 या विधानसभा निवडणुकीत इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निवडून आलेत. आधी विलास लांडे अन नंतर विलास लांडेंच्या विरोधात बंडखोर महेश लांडगे. अपक्ष आमदार झालेल्या लांडगेंनी नंतर सत्तेची समीकरणं पाहत भाजपशी घरोबा केला. त्यामुळं भोसरी मतदार संघावर भाजपचा दावा आहे. पण युतीत फूट पडल्यास इथं धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट होईना. भोसरी विधानसभा मतदार संघ हा शिरूर लोकसभेचा घटक आहे. 2009 च्या पुनर्रचनेत हा मतदार संघ स्थापन झाला. अनेक छोट्या-मोठ्या गावांचा यात समावेश असून पिंपरी विधानसभेच्या तुलनेत इथं झोपडपट्टीचा परिसर फारच कमी आहे, तर मराठा समाजाचं इथं प्राबल्य आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या परिसरातून इथं अनेक नागरिक स्थलांतरित झालेत. उड्डाण पूल, स्पाईन रोड, मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती अन राज्यस्तरीय कुस्ती मैदान असा बराचसा विकसित भाग या मतदार संघात येतो. रेड झोन, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत बांधकामावर आकारला जाणारा दंड अर्थात शास्ती कर, कचरा डंपिंग ग्राउंड अशी वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न या मतदार संघाशी निगडित आहेत. 2009 साली विद्यमान आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. शिवसेना अर्थात युतीचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांना चितपट करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. मात्र लांडे यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर होऊ घातलेल्या 2009च्या विधानसभेसाठी ही ते तीव्र इच्छुक होते. पण त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने मंगला कदम यांना तिकीट दिलं. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या लांडेंनी बंडखोरी केली आणि ते निवडून आले. अपक्ष आमदार झालेल्या लांडेंनी स्वगृही परतत 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून मात्र लांडे चार हात लांबच राहिले. मग पक्षाने देवदत्त निकम यांच्या रूपाने नशीब अजमवलं. पण तरी ही शिवसेना अर्थात युतीच्या आढळरावांनी गड राखला. भोसरी विधानसभेत लांडे आमदार असताना ही युतीला विक्रमी मताधिक्य मिळालं. लोकसभेला अनुत्सुक असणारे लांडेंनी 2014च्या विधानसभेसाठी शड्डू ठोकले होते, पक्षाने ही त्यांना तिकीट दिलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेले पैलवान महेश लांडगेंनी बंडखोरी केली. तेंव्हा आघाडीत बिघाडी अन युतीत फूट झाल्याने इथून पंचरंगी लढत झाली. अन 2009च्या निकालाची पुनरावृत्ती होत अपक्ष उमेदवार महेश लांडगेंनी सर्वांना चितपट केलं. सत्तेची समीकरणं पाहत अपक्ष आमदार लांडगेंनी 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी घरोबा केला अन महापालिकेत सत्ता काबीज करण्यात मोलाचा वाटा उचलला. भाजपची शहरात वाढणारी ताकद पाहून 2019च्या लोकसभा निवडणुकीत पैलवान आमदार लांडगेंनी शड्डू ठोकला. विद्यमान खासदार आढळरावांना चितपट करण्याचे मनसुबे आखणाऱ्या लांडगेंनी ऐनवेळी आपण निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. त्याला कारण ही तसंच होतं, ते म्हणजे शिवसेनेच्या गोठातून शरद पवारांनी अमोल कोल्हेंना फोडल्याचं. शिवबंधन तोडून मनगटी घड्याळ बांधलेल्या कोल्हेंनी एकहाती किल्ला लढवत आढळरावांचा त्रिफळा उडवला. पण भोसरी विधानसभेतून त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही. हीच बाब 2019च्या विधानसभेसाठी युती अर्थात भाजपला फायद्याची ठरणारी आहे. मात्र लांगडेंचं 'व्हिजन 2020' अद्याप ही कागदावर असल्यानं अन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात सुरु असलेलं 'कार्य' पाहता, मतदार काय विचार करतो हे पाहणं महत्वाचं राहील. त्यातच विलास लांडेंनी यंदा निवडणूक लढणार नसल्याचं तूर्तास तरी जाहीर केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता यांनी दत्ता सानेंनी लांडगेंचा पराभव करण्यासाठी 'शेंडी' वाढवलीये. पण ते शिवसेना किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदार महेश लांडगे हेच इथून युतीचे उमेदवार असतील, पण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात कोण असेल? हे अद्याप ठरलेलं दिसेना. 2009 आणि 2014 साली मतदारांनी अपक्ष उमेदवाराला कल दिल्यानं त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये ही होईल, असा कयास काही इच्छुकांनी बांधलाय. त्यातच युतीत फूट झाल्यास अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. त्या घडामोडींवरच इथला आमदार कोण? हे स्पष्ट होईल. 2019च्या शिरूर लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं शिवाजीराव आढळराव (शिवसेना)  - 1 लाख 25 हजार 335 डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 88 हजार 259 (विजयी) जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Karjat Kasara local Update : कर्जत, कसारा या मार्गावर जाणाऱ्या लोकल दीड तास उशिरानेMumbai School Update : मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीरRatnagiri Rain Jagbudi River : जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वरMumbai Air Way : दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Embed widget