एक्स्प्लोर

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | शिवसेना प्रबळ दावेदार मात्र युती फॅक्टर महत्वाचा ठरणार

2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीच्या सेटलमेंटमध्ये आणि दिलेल्या शब्दामुळे राजकीय ताकद वाढवूनही भाजपला या मतदार संघावर पाणी फेरावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला दुसऱ्यांदा विजयाची संधी निश्चितच मिळणार आहे मात्र त्यासाठी युती फॅक्टर महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आतापर्यंत या मतदार संघावर तब्बल 25 वर्ष भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 1990 ते 2009 या 25 वर्षांच्या काळात सेना भाजपच्या युतीचे भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा हे या मतदार संघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाल्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणूकीत विष्णू सावरा यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. जिल्हा विभाजना बरोबरच युतीच बिनसल्यामुळे 25 वर्षांपासून एकत्र असलेले सेना भाजप हे मित्रपक्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले. त्यामुळेच परंपरागत भाजपकडे असलेला मतदारसंघ शिवसेनेने लढवत भाजपवर मात केली. या मतदार संघाचा राजकीय इतिहास पहिला तर 1990 पासून या मतदार संघातून भाजपचे आमदार विष्णू सावरा तब्बल पाच वेळा या मतदार संघाचे आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे 1980 पासून विष्णू सावरा हे या मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत होते. मात्र 1980 ते 1990 या दहा वर्षांच्या काळात या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून काँग्रेसचे शंकर गोवारी हे या मतदारसंघाचे आमदार होते. तर त्यानंतर 1990 च्या विधानसभा निवडणुकीत विष्णू सावरा यांनी काँग्रेसच्या लक्ष्मण दुमाडा यांचा 12 हजार 528 मतांनी पराभव करून हा मतदार संघ भाजपकडे खेचून घेतला. 1990 च्या निवडणुकीत भाजपचे विष्णू सावरा यांना 48 हजार 184 मते मिळाली होती तर काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा यांना 35 हजार 656 मते मिळाली होती. काँग्रेसकडून खेचून घेतलेला हा मतदार संघ तब्बल 25 वर्ष भाजपकडेच होता. मधल्या काळात भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे या मतदार संघावर 2014 पर्यंत भाजपचेच वर्चस्व होते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत असलेली युती आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युतीचं बिनसलेलं गणित यांमुळे शिवसैनिकांनी करो या मरो ची लढत देत या मतदारसंघावर आपले अस्तित्व सिद्ध केले. शिवसेनेचे शांताराम मोरे हे 2014 च्या निवडणुकीत 57 हजार 082 मते मिळवून 9 हजार 160 च्या मताधिक्याने या निवडणुकीत निवडून आमदार झाले. त्यावेळी भाजपचे शांताराम पाटील यांनी देखील सेनेला कडवी टक्कर दिली होती मात्र त्यांना 47 हजार 922 मतांवर समाधान मानावे लागले . तब्बल 25 वर्ष भाजपचे अधिराज्य व वर्चस्व असलेला हा मतदार संघ शिवसैनिकांनी जिकरीचे लढाई देत आपल्याकडे खेचून घेतला. तर दुसरीकडे 25 वर्षांपासून या मतदार संघावर मजबूत पकड ठेवणारे भाजप आमदार व माजी मंत्री विष्णू सावरा यांना जिल्हा विभाजनामुळे पालघरच्या विक्रमगड विधानसभेतून उमेदवारी मिळाल्याने निवडणुकीच्या काळात त्यांना भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाकडे लक्ष देता आले नाही त्याचाही फायदा शिवसेनेला झाला. एकंदरीतच जिल्ह्याचे विभाजन आणि त्यातून सावरांचा बदललेला विधानसभा मतदारक्षेत्र आणि तुटलेली युती याचा फायदा शिवसेनेला आपसूकच झाला.
भिवंडी ग्रामीणचे तब्बल 25 वर्ष आमदार राहिलेले विष्णू सावरा यांना विक्रमगडसारख्या नवख्या मतदार संघात निवडणूक लढण्याचे आव्हान होते. मात्र राजकीय अनुभवावर सावरांनी युती नसतांनाही विभक्त लढत आपल्या व भाजपच्या विजयाची परंपरा तेथेही कायम ठेवली आणि या मतदार संघातूनही विजयाची माळ आपल्या गळ्यात पडून घेतली. सहाव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकल्याने विष्णू सावरा यांची थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली होती. दुसरीकडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांनी भरभरून मतदान केल्याने अनेक ठिकाणी भाजप सेनेचे लोकसभा उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने हि निवडणूक विभक्त लढली. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना साथ देऊनही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात थेट सेनेवर ताशेरे ओढणाऱ्या भाजपच्या पक्षश्रेष्ठीना भिवंडी ग्रामीण मतदार संघातील शिवसेनेची ताकद दिसावी यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत आपल्या उमेदवाराला निवडणुकीत निवडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने शांताराम मोरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिल्याने भाजपच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदार संघ शिवसेनेने आपल्या कडे खेचून घेतला. 2014 च्या निवडणुकीनंतर बिनसलेल्या युतीमुळे शिवसेनेने या ग्रामीण मतदार संघात आपली पकड मजबूत करत पुढे ग्रामपंचायत निवडणुकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती , जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
यावेळी मात्र या विधानसभा मतदार संघाची गणित बदलली आहेत. सेना भाजपच्या युतीची शक्यता वाढल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण युती झाली तर हा मतदारसंघ पुन्हा सेनेच्या वाट्याला असणार आहे. आणि मागील पाच वर्षात सेनेने या मतदार संघात केलेली कामे व पक्षाची वाढलेली ताकद याचा निश्चितच फायदा या निवडणुकीत होणार आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपली रणनीती आखायला सुरुवात केली असून या मतदार संघासाठी उमेदवारांच्या चाचपणी साठी पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये भाजपचे महादेव घाटाळ, दशरथ पाटील, शांताराम पाटील, संतोष जाधव, वाड्याचे भाजप कार्यकर्ते डॉ हिरवे, भाजप कार्यकर्ते गौंड अशा भाजप कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. तर शिवसेनेचे शांताराम मोरे यांनीही आपली पूर्ण तयारी ठेवली आहे.
विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत असलेल्या कपिल पाटील यांनी भाजप प्रवेश करून खासदारकीची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. खासदार कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशापासून राष्ट्रवादीची झालेली वाताहत आजही सुरूच आहे. त्यामुळे एकेकाळी सेना भाजप सारख्या मातब्बर पक्षाला टक्कर देणारी राष्ट्रवादी कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भिवंडी ग्रामीण मतदार संघात कमजोर झाली आहे. त्यातच सलग दोनदा भाजपचे खासदार झालेल्या कपिल पाटलांनी विष्णू सावरा यांची कमी भरून काढण्याचे काम करत या मतदार संघात भाजपला मजबूत करण्याचे काम देखील केले आहे. विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजपा विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांना भाजपा मध्ये खेचण्याचे महत्वाचे काम खासदार कपिल पाटील यांनी केले असून या मतदार संघात भाजपनेही वर्चस्व स्थापित केले आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीचे गणित पाहता शिवसेनेचे शांताराम मोरे यांना 57 हजार 082  मते , भाजपचे शांताराम पाटील यांना 47 हजार 922 मते , मनसेचे दशरथ पाटील यांना 25 हजार 580 मते , राष्ट्रवादीचे महादेव घाटाळ यांना 23 हजार 413 मते , काँग्रेसचे सचिन शिंडगा यांना 10 हजार 923 मते मिळाली होती. मात्र सध्या राष्ट्रवादीचे महादेव घाटाळ व मनसेचे दशरथ पाटील हे भाजपमध्ये आल्याने या मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. तर सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झालेली वाताहत याचा दुहेरी फायदाही भाजपला होत आहे. त्यामुळे या मतदार संघावर भाजपनेही आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय डावपेच आखले आहेत मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीच्या सेटलमेंटमध्ये आणि दिलेल्या शब्दामुळे राजकीय ताकद वाढवूनही भाजपला या मतदार संघावर पाणी फेरावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला दुसऱ्यांदा विजयाची संधी निश्चितच मिळणार आहे मात्र त्यासाठी युती फॅक्टर महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.
 २००९ भिवंडी ग्रामीण  विधानसभा 
१)   विष्णु सावरा                - भाजप          - ४६९९६ (विजयी)
२)  शांताराम पाटील           - राष्ट्रवादी       -  ४४८०४ 
३)  दशरथ पाटील              -  मनसे           -  ३६६८७ 
--------------------------------------------------------------
     एकूण मतदान   - १३५५३८       टक्के  - ५६.०० %
 
२०१४  भिवंडी ग्रामीण  विधानसभा 
---------------------------------------------------------------
१)   शांताराम मोरे               - सेना           - ५७०८२ (विजयी)
२)  शांताराम पाटील           - भाजप          -  ४७९२२  
३)  दशरथ पाटील              -  मनसे          -  २५५८० 
--------------------------------------------------------------
     एकूण मतदान   - १७३७५८       टक्के  - ६६.०० %
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget