Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदारसंघात मविआचे सुरेश म्हात्रे विजयी, कपिल पाटील यांचा दारुण पराभव
Bhiwandi Lok Sabha Election 2024 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांचा पराभव केला आहे.
Lok Sabha Election 2024 Result : भिवंडी मतदारसंघात शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीला राज्यात आणखी एक जागा मिळाली आहे. सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे कपिल पाटील यांचा पराभव केला आहे. भिवंडी लोकसभेत बाळ्या मामा यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मिळवलेली आघाडी कायम ठेवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला.
भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा विजयी
महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात पार पडलं होतं. मागील 2019 च्या तुलनेत यावेळेस मतांमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली, एकूण 56.41% मतदान झाल्याचं आकडेवारी समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत दुहेरी लढत पाहायला मिळाली होती. पण यावेळेस विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी तगडं आव्हान उभा केलं असताना अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून चुरस निर्माण केली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भिवंडीच्या जनतेने अखेर बाळ्या मामा यांच्या बाजूने कौल देत त्यांना विजयी केलं.
2019 चा लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election 2019)
- कपिल पाटील (भाजप) - 5,23,583
- काशिनाथ तावरे (काँग्रेस) - 2,15,380
- कपिल पाटील यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी विजय
2014 चा लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election 2014)
- कपिल पाटील (भाजप) - 4,11,070
- रामचंद्र पाटील (काँग्रेस) - 3,01,620
- सुरेश म्हात्रे (मनसे) - 93,647
- कपिल पाटील यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी विजय
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी
- भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - 72.66 टक्के
- शहापूर विधानसभा मतदारसंघ - 70.26 टक्के
- भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - 55.17 टक्के
- भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ - 49.87 टक्के
- कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - 52.98 टक्के
- मुरबाड विधानसभा मतदारसंघ - 61.12 टक्के
कपिल पाटील सलग दोनदा विजयी
भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांनी एक हाती सत्ता राखली होती. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्यानं त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यंदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून कपिल पाटील हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत.
भिवंडी लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या : 6
- भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना शिंदे गट)
- शहापूर - दौलत दरोडा (अजित पवार गट)
- भिवंडी पश्चिम - महेश चौघुले (भाजप)
- भिवंडी पूर्व - रईस शेख (समाजवादी पक्ष)
- कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर (शिवसेना शिंदे गट)
- मुरबाड - किसन कथोरे (भाजप)
कपिल पाटील सलग दोनदा विजयी
भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांनी एक हाती सत्ता राखली होती. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्यानं त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यंदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून कपिल पाटील हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत.