Gondia-Bhandra Lok Sabha Result 2024 : अटीतटीच्या सामन्यानंतर डॉ. प्रशांत पडोळे विजयी; भाजपच्या सुनील मेंढेचा मात्र पराभव! भंडारा-गोंदिया मतदारसंघात 25 वर्षानंतर पंजा
Gondia-Bhandra Lok Sabha 2024 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे यांनी पहिल्याच टर्म मध्ये महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे.
Bhandara Gondia Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता हाती आला आहे. त्यानंतर आता देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेला मतदानाचा कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे कल क्षणाक्षणाला बदलताना दिसले आहे. अशातच विदर्भातील महायुतीला मोठा धक्का बसला आहे आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे.
विदर्भातील दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. अशातच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Lok Sabha Election) काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) आणि सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्यात अतीतटीची लढत होताना दिसत आहे. राज्यात एकट्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अखेर 30 व्या फेरीत डॉ. प्रशांत पडोळे यांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर 32 हजार 945 मतांनी आघाडी घेत आपल्या गळ्यात पहिल्याच टर्म मध्ये विजयाची माळ घातली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात पहिल्याच टर्ममध्ये विजय
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Lok Sabha Election) काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) आणि सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र असे असले तरी खऱ्या अर्थाने या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
भंडारा-गोंदिया हा प्रफुल पटेल आणि नाना पटोले ह्या दोन्ही मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ असल्याने संपूर्ण विदर्भाचे नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. नाना पटोले यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षानंतर निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरूसीची झाली.
तर दुसरीकडे महायुतीत भाजपने सलग दुसऱ्यांदा सुनील सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दर्शवत सलग दुसऱ्यांदा संधी दिली. त्यामुळे आता या मतदारसंघात मतदारराजा पंतप्रधान मोदींना साथ देत सुनील मेंढे यांना तिसऱ्यांदा दिल्ली दरबारी पाठवतात की काँग्रेसच्या नव्या चेहऱ्याला संधी देत 25 वर्षानंतर पंजा विजयी होणार, हे आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निकालानंतरच (Lok Sabha Election Result 2024) स्पष्ट होणार आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा निकाल 2024 (Ramtek Lok Sabha Election Result 2024)
भंडारा-गोंदिया मतदारसंघात यंदा 67.4 टक्के टक्के मतदान झालं.
उमेदवाराचे नाव | पक्ष | मिळालेली मते | निकाल |
सुनील मेंढे | भाजप | 5,14,181 | पराभव |
डॉ. प्रशांत पडोळे | काँग्रेस | 5,47,126 | विजयी |
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?
कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांचा हा गृह मतदारसंघ असल्याने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर यावेळी मतदारसंघात आपले वर्चस्व टिकवून ठेवणे हे दोन्ही नेत्यांसाठी मोठे आव्हान असल्याचे देखील बघायला मिळाले आहे.
परिणामी, काँग्रेस आणि भाजपने या मतदारसंघात मतदारांना साद घालण्याची कुठलीच कसर सोडली नाही. यात अगदी दिग्गज नेतेही प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार प्रसार करताना दिसून आले. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अमित भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या भव्य सभा घेत शक्तिप्रदर्शन केले. तर दुसरीकडे नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांनीही मतदान होईपर्यंत मतदारसंघात तळ ठोकून असल्याचे बघायला मिळाले. मात्र आता मतदारराजा नेमका कुणाला आणि कुठल्या मुद्द्यावरून आपला कौल देतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
2019 चा निवडणूक निकाल - (Bhandara Lok Sabha Constituency 2019 Result)
- भाजपचे सुनील मेंढे - 6,50,243 (विजयी)
- राष्ट्रवदीचे नाना पंचबुध्धे - 4,52,849 (पराभव)
2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपचे सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांचा सुमारे 2 लाख मतांनी दारूणं पराभव केला होता. राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन्ही मातब्बर नेते विरोधात असताना देखील सुनील मेंढे यांनी 2019 मध्ये एक हाती विजय मिळविला होता.
दृष्टिक्षेपात भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक
भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा जन्म झाल्यानंतर याठिकाणी 2009 च्या पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा विजय झाला होता. त्यावेळी केंद्रात यूपीए-2 सरकार होते. 2014 मध्ये भाजपने नाना पटोले यांना मैदानात उतरवले होतं आणि नाना पटोले या ठिकाणी विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर 2018 मध्ये काही कारणास्तव नाना पटोलेंनी भाजपला राम राम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्यानंतर 2019 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांचा विजय झाला.
त्यानंतर परत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा पुन्हा भाजपकडे आली आणि तेव्हा सुनील मेंढे खासदार झाले. मात्र यंदा पटोले यांनी ऐनवेळी या लढाईत उमेदवार म्हणून माघार घेतल्याने भाजपविरुद्ध काँग्रेसला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. दुसरीकडे भाजपमध्येही उमेदवार बदलीच्या मागणीमुळे काही नाराजीचा सुर होता. त्याचा फटकाही यंदा बसू शकतो.
पोवार समाजाचे मत ठरतील निर्णायक
गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेल्या पोवार समाजाची भूमिका या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक असणार आहे. बहुसंख्येने असलेल्या पोवार समाज बांधवांनी कुणाला मतदान केले यावर भंडारा गोंदिया लोकसभेचा निकाल ठरेल ?
सुनील मेंढेच्या विजयाला प्रफुल्ल पटेलांचे बळ ?
नागपूर खालोखाल भाजपसाठी सर्वात सेफ सीट म्हणजे भंडारा-गोंदिया. भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे इथे जिंकतील असं वातावरण आहे. स्थानिक मुद्द्यांबाबतचा रोष कमी ठेवण्यात आणि मोदी मॅजिक मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शेतकरी बाजारात सुद्धा इथे जय श्रीरामचे नारे ऐकू आले. जिसने राम को लाया है हम उसीको लायेंगे अशा घोषणाही इथे कानावर येत होत्या. देश आणि धर्माबाबत या मतदारसंघात जास्त जागरुकता दिसली. सुनील मेंढे सुरुवातीला बजरंग दलात होते, तेव्हा 1992 च्या कारसेवेसाठी अयोध्येत गेले होते ही पार्श्वभूमी सुद्धा बहुतांश मतदारांना माहिती आहे असं दिसलं. प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंच्या लढतीमुळे राष्ट्रीय पातळीवर या मतदारसंघाला महत्व आलं होतं. इथे भाजपची साधारण सहा लाख मतं आहेत असं 2014 आणि 2019 ची आकडेवारी बघितली तर आपल्याला कळु शकतं.
राष्ट्रवादीकडून लढताना प्रफुल्ल पटेल यांची स्वत:ची 4 लाखांपेक्षा जास्त मतं आहेत. ते प्रफुल्ल पटेल यावेळी भाजपसोबत आहेत. त्यामुळे सुनील मेंढेंचा विजय निश्चित मानला जातोय. त्यांच्या विरोधात डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसनं उतरवलं आहे. गावाखेड्यात प्रचार करण्यावर त्यांचा भर आहे. दोन्ही उमेदवार कुणबी असले तरी झाडे, बावणे असा पोटजातीचा सुद्धा एक अँगल इथल्या लढतीत दिसत आहे. काँग्रेसच्या नाना पटोले इथून आमदार असल्यामुळे त्यांनीही जोर लावला आहे. या लोकसभा मतदारसंघात 6 पैकी फक्त एक आमदार भाजपचा असला तरी त्याचा फायदा विरोधक घेतील अशी स्थिती दिसली नाही. त्यात इथे रामाच्या नावावर, राष्ट्रवादाच्या नावावर, मोदींच्या नावावर मतदान होईल अशी शक्यता जास्त आहे. सुनील मेंढे गेल्या वेळी साडे सहा लाख मतं घेत जवळपास 2 लाख मतांनी निवडून आले होते. यंदा फार वेगळी स्थिती असेल असं वाटत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या