एक्स्प्लोर

बीड जिल्ह्यातील विधानसभेची खडाजंगी! राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या लढतीत कुणाचे पारडं जड? 6 मतदारसंघातील चित्र स्पष्ट

Vidhan Sabha Election 2024 : बीड जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा आहेत. या सहा जागांवर काट्याची लढाई होत आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये सामना रंगतोय.

Beed District Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीडसह (Beed District Vidhan Sabha Election) जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून लोकसभा निवडणुकांतील यशाचा आधार घेत आणि अपयशाला पाठीशी टाकत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे दिसून येतंय. तर काही ठिकाणी मनसे आणि वंचितसह इतर पक्षही रिंगणात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागांवर विजय मिळवणारी महाविकास आघाडी तर 17 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीमध्ये लढाई आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही पूर्णतः निकालात न निघाल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, लोकसभा निवडणुकांची मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील इम्पॅक्ट दिसून आलाय. त्यात, बीड (Beed) लोकसभा मतदारसंघात बीडचा खासदार बदलण्यातही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला. त्यामुळे, आता बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
 
कोणा विरुद्ध कोण रिंगणात?

मराठवाड्यातील कायम चर्चेत राहणारा मतदारसंघातील परळीमध्ये यंदा एकूण 11 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रामुख्याने अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनासह पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. परळी मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात पहिल्यापासूनच केंद्रबिंदू राहिलेला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीमुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघा बहिण भावात लढत होणार नाही. मात्र याच मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. परळी मतदारसंघातील 122 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. आणि याच मतदान केंद्रावर निवडणूक विभागासह पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान बूथ कॅप्चरिंगचा प्रकार समोर आला होता. हाच प्रकार विधानसभा निवडणुकीत टाळण्यासाठी निवडणूक विभाग सज्ज आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रशासनाची नजर असणार आहे.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
परळी विधानसभा

धनंजय मुंडे (NCP- AP)

राजेसाहेब देशमुख (NCP-SP)    
बीड विधानसभा योगेश क्षीरसागर (NCP- AP) संदीप क्षीरसागर (NCP-SP) अनिल जगताप जरांगे समर्थक ज्योती मेटे शिवसंग्राम संघटना  
गेवराई विधानसभा विजयसिंह पंडित (NCP- AP) बदामराव पंडित (शिवसेना-ठाकरे गट) मयुरी मस्के (मनसे)  
केज विधानसभा नमिता मुंदडा (भाजप) पृथ्वीराज साठे (NCP-SP)    
माजलगाव विधानसभा प्रकाश सोळंके (NCP- AP) मोहन जगताप (NCP-SP) रमेश आडसकर(अपक्ष)  
आष्टी विधानसभा सुरेश धस (भाजप) मेहबूब शेख (NCP-SP) भीमराव धोंडे(अपक्ष)  

बीडसह मराठवाड्यात कोणाची हवा?

  • बीड विधानसभा मतदारसंघ

बीड जिल्ह्यावर पहिल्यापासून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा दबदबा राहिला आहे, त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) व धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे जिल्ह्याचं नेतृत्व आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, बीड विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना पाहायला मिळू शकतो. क्षीरसागर भावांमध्ये लढत होणार असून यात जरांगे फॅक्टर देखील पाहायला मिळू शकतो. जरांगे पाटील यांनी आवाहन करून देखील अनिल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे क्षीरसागर व्यतिरिक्त अनिल जगताप आणि ज्योती मेटे यांची निवडून येण्याची शक्यता आहे. अनिल जगताप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली. मागील 40 वर्षांपासून जगताप शिवसेनेत कार्यरत आहे. तर दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. ज्योती मेटे या उच्च पदस्थ अधिकारी होत्या. मात्र मेटे यांच्या निधनानंतर त्या राजकारणात आल्या आहेत.

  • परळी विधानसभा मतदारसंघ

परळी विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. अपक्ष उमेदवार राजेभाऊ फड यांनी उमेदवारी मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे.

  • केज विधानसभा मतदारसंघ

केज मतदार संघ राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुंदडा विरुद्ध साठे ही लढत होणार असून मागील पाच वर्षांमध्ये मुंदडा यांच्यावर मतदारसंघात मतदार नाराज आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे. 

पृथ्वीराज साठे यांना पसंती मिळण्याची शक्यता असून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. साठे यांना पक्षाने बळ दिले असून मुंदडा आणि साठे यांच्यात अटीतटीची लढत होईल.

  • आष्टी (Ashti) विधानसभा मतदारसंघ

आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. भीमराव धोंडे यांच्या आष्टी मतदारसंघात शिक्षण संस्था आहेत. आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांना मतदारसंघात पसंती आहे. त्यामुळे धस किंवा धोंडे या दोघांपैकी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. भीमराव धोंडे हे भाजपाचे माजी आमदार असून पक्षाने संधी दिली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

  • गेवराई (Gevrai) विधानसभा मतदारसंघ

गेवराई विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटविरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. मात्र पंडित विरहित मतदारसंघ करण्यासाठी पुढाकार घेतला असून या मतदारसंघात मनसेच्या मयुरी मस्के निवडून येण्याची शक्यता आहे.

मयुरी मस्के या विविध सामाजिक कार्यातून गेवराई मतदार संघात ऍक्टिव्ह आहेत. शेतकरी सामाजिक प्रश्नात मस्के दांपत्यानं पुढाकार घेऊन प्रस्थापित पंडित आणि पवार कुटुंबाला आव्हान दिले आहे. मयुरी मस्के या उच्चशिक्षित असून पहिल्यांदाच या मतदारसंघात एक महिला निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मतदारांची पसंती त्यांना मिळू शकते.

  • माजलगाव विधानसभा मतदारसंघ

माजलगाव विधानसभा मतदारसंघात हे तीनही उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. प्रकाश सोळंके यांची पुन्हा मतदार संघात निवड होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल.

बीड जिल्ह्यातील आमदारांची यादी 

 गेवराई विधानसभा -  लक्ष्मण पवार (भाजप)
 माजलगाव विधानसभा -  प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
 बीड विधानसभा -  संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
आष्टी विधानसभा -  बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
 केज विधानसभा -  नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा -  धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)

2019 चे पराभूत उमेदवार 

गेवराई – विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस) 
माजलगाव – रमेश आडासकर (भाजप)
बीड –जयदत्त  क्षीरसागर (शिवसेना)
आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)
केज –  पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी काँग्रेस)
परळी – पंकजा मुंडे (भाजप )

संबंधित बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget