Election Results 2023 LIVE updates : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजपची मोठी आघाडी; काँग्रेसची पिछेहाट
Assembly Election Results 2023 LIVE Updates : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा (Assembly Election Results) निकाल जाहीर होत आहे.
LIVE
Background
5 States Election Results मुंबई : मिनी लोकसभा (Mini Lok Sabha) म्हणून पाहिल्या जात असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांची (Assembly Election Results) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता पाचपैकी चार राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. मिझोराममध्ये सोमवारी 4 डिसेंबरला मतमोजणी होईल. लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. पाच राज्यांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलचे (Exit Poll 2023) आकडे समोर आले. आता प्रत्यक्षात कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलं.
Election Results 2023 LIVE updates राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Rajasthan Assembly Election Results 2023 LIVE)
राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Vidhan Sabha Election 2023) निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राजस्थानात 199 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदार पार पडलं. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Rajasthan Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Rajasthan) बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.
Election Results 2023 LIVE updates राजस्थान विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल 2018 (Rajasthan Election result 2018)
- भाजप (BJP) - 100
- काँग्रेस (Congress) - 73
- बसपा - 6
- इतर - 21
- एकूण 200
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Madhya Pradesh Assembly Election Results 2023 LIVE)
मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. 80 टक्के मतदारांनी आपले मतदान केलं. त्यामुळे 230 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे भाजपची सत्ता कायम ठेवतात की काँग्रेसचे कमलनाथ (Kamal Nath) बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मध्य प्रदेश विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल (Madhya Pradesh Election Result 2018)
- भाजप - 165
- काँग्रेस - 58
- बहुजन समाज पक्ष - 4
- इतर - 3
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Chhattisgarh Assembly Election Results 2023 LIVE)
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2023 कडे (Chhattisgarh Vidhan Sabha Election result 2023) देशाचं लक्ष लागलं आहे. तुलनेनं छोटं मात्र महत्वाचं असं राज्य आहे छत्तीसगड. इथल्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पडलं. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे निकालात स्पष्ट होईल.
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Telangana Assembly Election Results 2023 LIVE)
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 (Telangana Vidhan Sabha Election 2023) निकाल आज जाहीर होत आहे. आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे निकालात स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे.
मिझोराम विधानसभा निवडणूक निकाल 2023 (Mizoram Assembly Election Results 2023 LIVE)
मिझोराममध्येही 3 डिसेंबरला मतमोजणी नियोजित होती, मात्र ही तारीख ऐनवेळी बदलून 4 डिसेंब करण्यात आली. मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागा आहेत. ईशान्य भारतातील मिझोरममध्येही 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.बहुमतासाठी 21 जागांचा टप्पा कोण गाठतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संबंधित बातम्या
Election Results 2023 : 4 पैकी 3 राज्यांत भाजप आघाडीवर
4 राज्यांच्या निकालात 3 राज्यांत भाजप आघाडीवर, पंतप्रधान मोदी मैदानात, जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन, भाजप मुख्यालयात संबोधित करणार!
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर
तेलंगणात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. सत्ताधारी बीआरएस पिछाडीवर आहे आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसला 119 पैकी 66 जागांवर आघाडी, तर बीआरएस 39 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत.
Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर
छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळते. पिछाडीवरुन भाजप पुन्हा आघाडीवर आला आहे. 90 जागांच्या विधानसभेत भाजप 49 तर, काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर आहे.
Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर
राजस्थानातही भाजपची आगेकूच पाहायला मिळते. 199 जागांपैकी 109 जागांवर भाजपची आघाडी आहे. सत्ताधारी काँग्रेसला आतापर्यंत 71 जागा मिळाल्या असून, फायनल निकालात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
कलांनुसार, तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. निवडणूक आयोगाच्या कलांनुसार, तेलंगणा राज्यात काँग्रेस 52 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे.
#WATCH | Congress cadre burst firecrackers outside the office of the party's state unit in Hyderabad as the party leads on 52 seats in Telangana pic.twitter.com/3Agy3Ha0rt
— ANI (@ANI) December 3, 2023