एक्स्प्लोर
जालन्यातून मला निवडणूक लढू द्या, अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंकडे आग्रह
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला वाद अद्यापह सुरूच आहे.

जालना : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला वाद अद्यापह सुरूच आहे. आज (रविवारी)जालन्यातील एका कार्यकर्मात खोतकर आणि दानवे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरुनच खोतकरांनी दानवेंना आग्रह केला की, जालना लोकसभेची जागा सोडून द्यावी, तिथे मला देण्यात यावी. दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी अद्याप या दोघांमधला वाद अद्याप मिटलेला नसल्याचे दिसत आहे. आज जालना येथे एका पुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी दानवे आणि खोतकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी खोतकरांनी जालना लोकसभेची जागा मला सोडावी, मला तिथे निवडणूक लढू द्यावे, असे थेट आवाहन दानवेंसमोर केले. दरम्यान, जालना मतदार संघाबाबत अद्याप आमचा निर्णय झालेला नसून आम्ही बाजूला गेलेलो नाही. असे बोलून खोतकरांनी दानवेंना झुलत ठेवलं आहे. परंतु दानवेंनी खोतकरांच्या या आवाहनाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे दोघांमधला वाद अद्याप शमलेला नसल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग




















