एक्स्प्लोर
खोतकरांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली, दानवेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता
युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे.
मुंबई : शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. कारण अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार असून काँग्रेस पक्षश्रेष्ठी लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
जालन्यात दानवेंविरोधात उभा राहून मीच जिंकणार : अर्जुन खोतकर
जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. स्वबळाच्या नाऱ्यानंतर येत्या निवडणुकीत जालन्यात रावसाहेब दानवेंना आस्मान दाखवू, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं. परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे.
तरीही दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम आहेत. युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला आहे. जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर : रावसाहेब दानवे
हीच संधी साधून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अर्जुन खोतकर यांना पक्षात घेऊन जालन्यातून उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement