एक्स्प्लोर

Andheri East Bypoll Election 2022 : निवडणूक लढवणार तर ती मशाल चिन्हावरच, आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबतच; ऋतुजा लटकेंनी स्पष्टच सांगितलं

Andheri East Bypoll Election 2022 : मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार, ऋतुजा लटके यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीतील (Andheri East Bypoll 2022) शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी सध्या सुरू असलेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता, निवडणूक लढणार तर मशाल या निवडणूक चिन्हावरच लढणार असून माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ऋतुजा लटके यांनी एबीपी माझाशी (ABP Majha) बोलताना सांगितलं की, "माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटलेले नाही. अंधेरीतील पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढणार" तसेच, "आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच आहे. माझे पती रमेश लटके (Ramesh Latke) यांचीही निष्ठा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेबांसोबत होती. आता मी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. राजीनाम्यासंदर्भात पुन्हा एकदा विनंती करणार आहे की, मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा.", असंही त्या म्हणाल्या. 

निवडणूक लढवणार तर ती मशाल चिन्हावरच : ऋतुजा लटके

"मला अशी माहिती देण्यात आली आहे की, सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. फक्त एक सही शिल्लक आहे.", अशी माहितीही ऋतुजा लटके यांनी दिली. तसेच, त्यांनी बोलताना मी निवडणूक लढवणार तर ती मशाल या चिन्हावरच लढणार, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. 

दरम्यान, ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाशी बोलताना ऋतुजा लटके यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत, आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

नाव आणि चिन्हाच्या लढाईनंतर सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नवीन ट्वीस्ट आला आहे. मंत्रिपदाची ऑफर देऊन ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. एवढंच नाही तर मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असलेल्या ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून दबाव टाकला जातोय, असा आरोप देखील ठाकरे गटानं केला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मंजूर व्हावा म्हणून ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली असून त्यावर आजच सुनावणी होणं अपेक्षित आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget