(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंचा 'प्लान बी'; नवा उमेदवार उभा करणार?
Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीसाठी 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाकडून दुसरा उमेदवारी देण्यासाठी शोध सुरू आहे.
Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच ऋतुजा लटकेंना आपल्याकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. अशातच ऋतुजा लटके शिंदे गटात गेल्यास ठाकरे गटानंही 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. ठाकरे गटाकडून दुसरा उमेदवार देण्याची तयारी सुरु झाली आहे. ऋतुजा लटके आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या चर्चेनंतर ठाकरे गट सावध झाला आहे. त्यामुळे अंधेरीतील दुसऱ्या एका शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी ठाकरे गटानं सुरु केली आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याचं कळतंय. अशातच ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांना भेटल्याची चर्चांना उधाण आलं आहे. 5 दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची चर्चा सध्या सगळीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ऋतुजा लटके शिंदेंना समर्थन देण्यार की, काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ऋतुजा लटके शिंदे गटात सामील झाल्या तर नवा पर्याय काय? अशी चाचपणी ठाकरे गटाकडून सुरु झाली आहे. तसेच, ऋतुजा लटकेंनी शिंदे गटात सामील झाल्यास ठाकरे गट नवा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
अंधेरी पूर्व पोट निवडणुकीसाठी 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाकडून दुसरा उमेदवारी देण्यासाठी शोध सुरू आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटानं ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्यानं ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. ऋतुजा लटके याना शिंदे गटाकडून देखील उमेदवारी देण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र असं मध्ये ऋतुजा लटके जर शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केली तर मात्र उद्धव ठाकरे गटाकडून देखील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याच्या माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक भाजप नाहीतर शिंदे गट लढवणार?
अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी शिंदे गट लढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याची चर्चा आहे. लटके यांना शिंदे गटात वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप माघार घेऊन शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही जागा सोडली जाऊ शकते अशी चर्चा आहे.