एक्स्प्लोर

ज्या पक्षानं मान दिला त्याविरोधात काही करणार नाही; भावूक अजित पवारांचं स्पष्टीकरण

अजित पवार राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर आणि ते 'आऊट ऑफ रीच' झाल्यामुळे निर्माण झालेल्या सर्व शंका-कुशंकांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला. कथिक भ्रष्टाचाराचे आकडे फुगवून सांगितलं जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात शरद पवारांचं नाव आल्यानं उद्विग्न होऊ राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं.

मुंबई: शरद पवारांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात आल्यानं अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. ज्या पक्षानं मला मान-सन्मान  व पदं दिली त्या पक्षाविरोधात काही करण्याचा विचारही करू शकत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि राष्ट्रवादीला सोडण्याच्या किंवा अन्य शक्यतांनाही त्यांनी फेटाळून लावलं. काल झालेल्या राजीनाम्यानंतर आज अत्यंत हायव्होल्टेज पत्रकार परिषदेत त्यांनी हे खुलासे केले. यावेळी पहिल्यांदाच भावनेचा बांध फुटून अश्रू अनावर झालेले अजित पवारही पाहायला मिळाले. काल अजित पवारानी राजीनामा दिल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. शरद पवार यांनीही काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार हे सध्याच्या राजकारणाला वैतागले असल्याचं सूचित केलं. अजित पवार यांनी आपले चिरंजीव पार्थ यांच्याकडे राजकारण सोडून शेती, उद्योग करण्याबाबत चर्चा केल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान, कालपासून आज ही पत्रकार परिषद होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. अखेर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहातील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम दिला. या पत्रकारपरिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार व छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील हे नेते उपस्थित होते. माझा राजीनामा अजित पवार यावेळी म्हणाले की, माझ्या अचानक राजीनाम्यानं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वेदना झाल्या. मी कुणालाही कल्पना दिली असती तर त्यांनी राजीनामा द्यायला नाहीच म्हटलं असतं. मात्र, त्यांच्या मनाला दुखावल्यानं मी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना कल्पना दिली होती. काही दिवसांपूर्वीपासून हे विचार माझ्या मनात येत होते, मात्र निवडणुकीच्या काळात पक्षाला अडचणीत टाकावं का, असंही वाटत होतं. २५ हजार कोटी, २५ हजार कोटी! आम्ही सारे सहकारी बँकांवर काम करत होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि अन्य पक्षातले लोकही सहकारी क्षेत्रात काम करत होते. या प्रकरणावर चौकशी होत असताना सहकार मंत्र्यांनी १ हजार कोटी रूपयांची इतर अनियमितता झाल्याचं म्हटलं. एकूण २५ हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. मात्र, १० हजार कोटीच्या ठेवी असलेल्या बँकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल? असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला. बँक अस्तित्वात आल्यापासून धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख असे नेते तसंच गोयल, श्रीवास्तव असे अधिकारी यांनीही यावर काम केलंय. ही शिखर बँक आहे. चांदा ते बांदा लोक इथं प्रतिनिधीत्व करतात. दुष्काळ पडला, काही अडचणी आल्या तर, 'आऊट ऑफ वे' जाऊन मदत करावी लागते. धनंजय महाडिक, विनय कोरे, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना 'आऊट ऑफ वे' जाऊनच सरकारनं मदत केली. हा सरकारचा अधिकार आहे. कारखाने अडचणीत आल्यास नाबार्ड, सरकार कर्ज देतं, शून्य टक्यानं कर्ज देतं. सगळं कर्ज फिटलं आहे. राज्य सरकारची गॅरंटी आहे.  यंदा ही बँक २८५ कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे. शरद पवार ते अजित पवार कालपासूनच्या सर्व घटनांचा आढावा म्हणून मी ईडी-पवार भेटीत सोबत नव्हतो.... १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचं असल्यानं हे प्रकरण ईडीकडे गेलं. शरद पवारांचा कोणताही संबंध नाही, ते संचालक नाहीत, काही ठिकाणी सभासद आहेत, असं असताना पवार साहेबांचं नाव बातम्यात आलं. मी मनाला विचारलं की साहेबांचं नाव का? अजित पवार-शरद पवार यांच्यातल्या नात्यांमुळे त्यांचं नाव आलं का? मी विचार करत होतो की आपण राजीनामा दिला पाहिजे, आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागतेय. म्हणून मी कुणालाही न सांगता राजीनामा दिला. मी माझा फोन बंद केला. मुंबईत एका नातेवाईकांकडे थांबलो. साहेबांची या वयात  बदनामी झाली यामुळे अस्वस्थ होतो. हे प्रकरण २०१९मध्येच कसं बाहेर आलं?  उद्विग्न व अस्वस्थ होऊन मी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी मला विचारलं की कशाला राजीनामा देता, पण मी त्यांना म्हणालो की नंतर सांगेन. राष्ट्रवादीत काही अडचणीमुळे राजीनामा देतोय का, असंही त्यांना वाटलं पण मी त्यांना व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं. मला विचारलं गेलं की ईडीच्या प्रकरणात मी पवारांबरोबर का नव्हतो. कारण, मी बारामतीमध्ये पूरस्थिती पाहत होतो. मदत कार्यात होतो. रात्री निघायचं होतं, मात्र पुण्यातून निघालो तर वाटेत पवारांच्या ईडी भेटीला पाठिंबा देणाऱ्यांची खूप गर्दी होती. म्हणून येता आलं नाही. मग, चित्र रंगवलं गेलं की अजित पवार आले नाहीत. ज्या पक्षानं अनेक मान-सन्मान मान दिले, त्या पक्षाच्या विरोधात काहीही करणार नाही. गृहकलह नाही, पवार साहेबच आमचे कुटुंबप्रमुख! आम्ही पवार कुटुंबिय अनेक वर्ष एकत्र काम करतोय. आजदेखील पवार साहेब सांगतील तसंच आम्ही करतो. मात्र, गृहकलह असं का पसरवलं जातं? आधी माझ्यावेळी, मग सुप्रिया, पार्थ आणि आता रोहितच्यावेळीही असं रंगवलं जातं. काल पवार म्हणाले तेच खरं  आहे. आमचं घर मोठं आहे. ज्येष्ठ व्यक्ती जे सांगतात तसं घडतं. पवारसाहेबांशी बोललो. मी म्हणालो की मी पुण्याला येतो.  मात्र, तेच म्हणाले की मीच मुंबईला येतो. त्यांना १ वा. भेटलो, भूमिका सांगितली. त्यांनीही मला जे सांगायचं ते संगितलं. त्यांनीच मला सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन काय ते सांग. ...आणि भावूक अजित पवार मागीलवेळी सिंचन घोटाळ्याबाबतही असेच आरोप झाले. ७० हजार कोटी रूपये म्हणे! पण, खात्याकडे पैसा किती आला, पगारासाठी, भूसंपादनासाठी, कामासाठी किती खर्च झाला याचा विचार का झाला नाही? त्यावेळीही नाराज होतो. त्या प्रकरणाची चौकशी किती वर्ष चाललीये? आता काय तर २५ हजार कोटींचा घोटाळा, एखाद्याला वाटेल की अजितचं हजारशिवाय चालतंच नाही. या ठिकाणी अजित पवारांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबियांसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया वाचा : शरद पवार ते अजित पवार कालपासूनच्या सर्व घटनांचा आढावा

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget