एक्स्प्लोर

Ajit Pawar on R. R. Patil : आर आरला कित्येकदा सांगायचो, तंबाखू खाऊ नको; आम्हाला खोटं सांगितलं, गाल सुजलाय, अजितदादांनी जुना किस्सा सांगितला

Ajit Pawar on R. R. Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत घेतलेल्या सभेत दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Ajit Pawar on R. R. Patil : "2004 सालं होतं, मला तरुणांना संधी देण्याची आवड होती. त्यावेळी आपला नेता कोण करायचा ते ठरलं. त्यामध्ये पद्मसिंह पाटील , विजयदादा , छगन भुजबळ , जयंत पाटील आणि आर आर पाटील होते. ते पाच जण उभे राहिले. या चार लोकांना इतकी कमी मतं पडली की ते म्हणाले आर. आरला जाहीर करुन टाका. मी सर्व मतं आर आरला मिळवून दिली. मला स्वत:ला नेता होता आलं असतं. मी म्हणालो नाही गरीब कुटुंबातील आहे. ग्रामीण भागातील आहे. शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे. मग त्यावेळेस तो उपमुख्यमंत्री झाला. खरं तर मुख्यमंत्री झाला असता साहेबांनी का सोडलं माहिती नाही. साहेबांनी चार मंत्रिपद जास्त घेतले आणि मुख्यमंत्रिपद सोडून दिलं",  असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. 

मी इस्लामपूरला त्याला तंबाखू खाऊ नको, असं सांगितलं होतं

अजित पवार म्हणाले, मी आर आरला राजीनामा द्यायला सांगितला, तो न सांगता अंजनीला निघून आला. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है असे म्हणाले आणि आर आर पाटील यांना कोणीतरी राजीनामा द्यायला सांगितला.  मला त्याने सांगितलंही नाही. पण नंतर मी त्याला पक्षाचा प्रांतअध्यक्ष केलं. नंतरच्या काळात बिचाऱ्याला आजार झाला. आम्हाला त्याने खोटं सांगितलं गाल सुजलाय, गालफुगी झाली. परंतु डॉक्टरांनी त्यांना सांगितलं काय झालंय ते. मी इस्लामपूरला त्याला तंबाखू खाऊ नको, असं सांगितलं होतं. मी त्याच्यावर टीका केली होती. कशाला तंबाखू खात असतो म्हणालो. पण मी नसलो की, गुपचूप तंबाखू खायचा. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झालं. परंतु माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस याही त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता. 

भाजपला बिनशर्त पाठिंबा कसं काय दिला जातो?

2014 मध्ये विधानसभेचा निकाल लागतो न लागतो तोपर्यंतच साहेबांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. भाजपला बिनशर्त पाठिंबा कसं काय दिला जातो?  विचारधारा सोडून कशी मदत केली असं विचारल्यावर साहेबांनी सांगितलं सरकार बदललं आहे मदत केली पाहिजे. 1999 मध्ये देखील असंच झालं होतं. सोनिया गांधी यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाली. लगेच विधानसभा निवडणुका होताच काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हा देखील साहेब म्हणाले सरकारमध्ये गेल्याशिवाय काम होत नाहीत. मग मी गेलो तर काय झालं. माझं काय चुकलं? असा सवालही अजित पवार यांनी केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar : आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरील सही फडणवीसांनी दाखवली, अजित पवारांचा आरोप

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची पूर्णवेळ हजेरी ठरली लक्षवेधी 
शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी 
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prithviraj Chavan on Ajit Pawar : अजितदादांचा आरोप, आबांची सही; पृथ्वीराज चव्हाणांनी सगळंच सांगितलंAaditya Thackeray Full PC : श्रीनिवास वनगांचं तिकीट कापलं,आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रियाABP MAJHAAnand Bharose on Rahul Patil : राहुल पाटलांनी फक्त स्वताचं घर भरलं, भरोसेंचा घणाघातTOP 25 News : Superfast News : 29 OCT 2024 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची पूर्णवेळ हजेरी ठरली लक्षवेधी 
शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी 
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Satyajeet Tambe : '...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही'; सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ
'...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही'; सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ
Dilip Mane : ज्यांनी तिकीट जाहीर केलं, एबी फॉर्म आणण्याची जबाबदारी त्यांची, अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर दिलीप मानेंनी राजकारण सांगितलं...
शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघण्यासाठी सांगितलं, एबी फॉर्म होता पण पोहोचवला नाही : दिलीप माने
Nawab Malik : अखेर सस्पेन्स संपला... नवाब मलिकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म, अजित पवारांनी मित्रपक्षांचा दबाव झुगारला
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रीन सिग्नल, नवाब मलिकांनी उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडला
Rohit Patil : 'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया
'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget