एक्स्प्लोर

राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, ती अटक मोठी चूक : अजित पवार

अजित पवार म्हणाले की, त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करू नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली.

मुंबई  : काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत बोलताना अजित पवारांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असंही अजित पवार म्हणाले. त्यामुळं बाळासाहेबांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यानं हट्ट धरला होता असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शरद पवारांची ईडी चौकशी राजकीय सूडाच्या भावनेपोटी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांना झालेल्या अटकेची आठवण करुन दिली होती. यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी बाळासाहेबांची अटक चूक असल्याचे म्हटले. अजित पवार म्हणाले की, त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करू नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करू नये, असे अजित पवार म्हणाले. आम्ही यावर आक्षेप घेतला असता 'आम्ही त्या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार आहोत', असं म्हटलं गेलं, असं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान यावेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विदर्भाविषयीच्या भूमिकेबाबत देखील मोठा गौप्यस्फोट केला. पवार यांनी सांगितलं की, फडणवीस म्हणाले होते की, माझ्या कारकिर्दीला साडेचार वर्ष झाल्यावर ठराव करून विदर्भ वेगळा करणार. तेलंगणासारखे विदर्भ देखील वेगळं राज्य आम्ही करणारच असं त्यांचं मत होतं. मात्र महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जसं-जसं एक एक महिना पुढे जाऊ लागलं तसं त्यांनी विदर्भ मराठवाड्यासह अख्ख्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राहणं पसंत केलं, असे पवार म्हणाले. काँग्रेसमुळे राज ठाकरेंना महाआघाडीत घेऊ शकलो नाही : अजित पवार राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याची आमची खूप इच्छा होती, परंतु काँग्रेसमुळे घेता आले नाही. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या. पवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काँग्रेस सोडून इतर मित्रपक्षांचा त्यास पाठींबा होता. परंतु काँग्रेसने मात्र त्यास विरोध केला. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकांमुळे काँग्रेस राज यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही. काँग्रेसला असे वाटते की, जर महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी आघाडी केली, तर त्याचा त्यांना उत्तर भारतात फटका बसेल. कदाचित काँग्रेसला राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात फायदा होईलही, परंतु काँग्रेसचे पारंपरिक उत्तर भारतीय मतदार काँग्रेसवर नाराज होतील, अशी भीती काँग्रेसला वाटते, असे पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
Manikrao Kokate : निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
गज्या मारणे गँगची पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं, मकोका लावणार
गज्या मारणे गँगची पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं, मकोका लावणार
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Harnawal on Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंवर बोलू नका, अन्यथा कुंडली बाहेर काढूVinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोपABP Majha Headlines : 11 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 24 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
Manikrao Kokate : निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
गज्या मारणे गँगची पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं, मकोका लावणार
गज्या मारणे गँगची पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं, मकोका लावणार
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
Neelam Gorhe & Sanjay Raut: नीलम गोऱ्हेंच्या चिखलफेकीची जबाबदारी शरद पवारांचीही, राऊतांचा हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया
नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने आगडोंब उसळला, राऊतांचा हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
मोहम्मद रिजवान भित्रा निघाला, बाबर आझम, तर एकदम बेकार! माजी पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटूच्या संतापाचा कडेलोट; फायनलला भारतासोबत कोण भिडू होणार? टीमचं नाव सांगितलं
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक
EPF Rate : 7 कोटी ईपीएफ खातेधारकांना गुड न्यूज, व्याजदासंदर्भात मोठी अपडेट, याच आठवड्यात बैठक
Shripal Sabnis: देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण, मी माझ्या पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो: श्रीपाल सबनीस
Embed widget