एक्स्प्लोर

Ajit Pawar NCP Meeting : अजित पवारांच्या बैठकीला कोण कोण उपस्थित, कुणाकुणाची दांडी?

Ajit Pawar NCP Meeting : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar MLA In Contact With Sharad Pawar : मुंबई : ट्रायडन्टमधील बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरीवर खलबतं सुरू आहेत. नाराज आमदारांना तोंड कसं द्यायचं? याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या  देवगिरीवर अनिल पाटील, हसन मुश्रीफ दाखल झाले आहेत. दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोडे देवगिरीवर दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची देवगिरीवर महत्त्वाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे, रामराजे निंबाळकर हे देवगिरीवर दाखल झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभेत भोपळा फुटला असला, तरी केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. पण, अजित पवारांच्या या बैठकीला काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांनी बोलवली तातडीची बैठक, अनेक आमदार गैरहजर राहणार?

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे. महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे. 7 आणि 8 तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. 

दादांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला आतापर्यंत कोण-कोण उपस्थित? 

  • दिलीप वळसे पाटील
  • हसन मुश्रीफ
  • अनिल पाटील 
  • आदिती तटकरे
  • संजय बनसोडे
  • आनंद परांजपे
  • रामराजे निंबाळकर

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचीच 'पॉवर' 

राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दादांसोबत कोणते आमदार गेले? 

  1. सरोज अहिरे
  2. धर्माबाबा आत्राम
  3. बाळासाहेब अजबे
  4. राजू कारेमोरे
  5. आशुतोष काळे
  6. माणिकराव कोकाटे
  7. मनोहर चांद्रिकेपुरे
  8. दीपक चव्हाण
  9. संग्राम जगताप
  10. मकरंद पाटील
  11. नरहरी झिरवाळ
  12. सुनील टिंगरे
  13. अदिती तटकरे
  14. चेतन तुपे
  15. दौलत दरोडा
  16. राजू नवघरे
  17. इंद्रनील नाईक
  18. मानसिंग नाईक
  19. शेखर निकम
  20. अजित पवार
  21. नितीन पवार
  22. बाबासाहेब पाटील
  23. अनिल पाटील
  24. राजेश पाटील
  25. दिलीप बनकर
  26. अण्णा बनसोडे
  27. संजय बनसोडे
  28. अतुल बेनके
  29. दत्तात्रय भरणे
  30. छगन भुजबळ
  31. यशवंत माने
  32. धनंजय मुंडे
  33. हसन मुश्रीफ
  34. दिलीप मोहिते
  35. किरण लहामटे
  36. दिलीप वळसे
  37. राजेंद्र शिंगणे
  38. बबनराव शिंदे
  39. सुनील शेळके
  40. प्रकाश सोळंके
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget