एक्स्प्लोर

Pune Vidhan Sabha Election 2024 : मतदान संपताच विजयाची लागली कुणकुण, पुण्यातील 'या' 3 उमेदवारांच्या समर्थकांनी सेलिब्रेशन केलं सुरु

Pune Vidhan Sabha Election 2024 : कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी आपले विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत विजयी झाल्याचे बॅनर आणि मिरवणुका देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

पुणे: राज्यातील विधानसभेसाठीच्या 288 मतदारसंघांमध्ये काल(बुधवारी) मतदान पार पडलं आहे. उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद आहे. 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी पुण्यातील (Pune News) काही मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांचे बॅनर झळकताना दिसत आहेत. काल मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात (Pune News) लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत. कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी आपले विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत विजयी झाल्याचे बॅनर आणि मिरवणुका देखील चर्चेचा विषय ठरला आहे. 

पर्वती विधानसभा मतदारसंघात झळकले बॅनर

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरासमोर अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर्स झळकल्याने चर्चा सुरू आहेत. निकालापूर्वीच शहरातील अनेक मतदारसंघांमध्ये विजयाचा जल्लोषाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे.पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या माधुरी मिसाळ आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यात लढत झाली आहे. पुण्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघात महिला उमेदवार आहेत. याच मतदारसंघात अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून विजयापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली आहे.

कसब्याचा आमदार मीच होणार; हेमंत रासने यांना विश्वास

निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मतदान झाल्यानंतर आज पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हे श्रमपरिहार करताना दिसत आहेत, हेमंत रासने यांनी मंडईतील मिसळ हाऊसमध्ये जाऊन मिसळीवर ताव देखील मारला आहे. रोजच्या मित्रमंडळींसोबत मिसळीचा आस्वाद घेताना ते दिसत आहेत. गेली पंधरा दिवस निवडणुकीची जी काही धामधूम होती, ताणतणाव होता त्यातूनं बाहेर पडून आज रिलॅक्स दिवस घालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसब्याचा आमदार मीच होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 

शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे यांना शुभेच्छा देणारे बॅनर

पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघ 2014 पासून भाजपचा किल्ला आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  त्यांनी 2019 साली काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत.  शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 44.95 टक्के मतदान झाले आहे. मात्र, निकालाआधीच  सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाचे आणि शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत.

सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक 

खडकवासला मतदारसंघाचे मविआचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. त्याचबरोबर फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत मोठी मिरवणूक काढली. दोडकेंची मिरवणूक सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.

खडकवासला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर, मनसेचे उमेदवार मयुरेश रमेश वांजळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दोडके सचिन यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मात्र, निकालाआधी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढली आहे. मात्र, राज्यातील 288 मतदारसंघातील उमेदवारांसह नागरिकांचं लक्ष्य निकालाकडे लागलं आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडते न पडते तोच पुण्यात लागलेले हे विजयाचे बॅनर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Embed widget