एक्स्प्लोर

शिवसेनाची उमेदवारीवर मिळताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा गौप्यस्फोट; महाविकास आघाडीकडून मला प्रस्ताव, मात्र....  

Narendra Bhondekar : 2024 च्या निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आला पण, मी तो स्वीकारला नसल्याचा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 भंडारापक्ष नेतृत्वानं माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली. त्यामुळं पक्ष नेतृत्वाचं आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांचा विश्वास पूर्णपणे सार्थकी लावून विजय संपादन करेल. यासोबतचं भंडारा जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही जागा निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. 2019 मध्ये काही नेत्यांमुळं मला तिकीट मिळाली नाही, नाहीतर मी महायुतीचा आमदार राहिलो असतो. 2024 च्या निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रस्ताव आला पण, मी तो स्वीकारला नसल्याचा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी केला आहे. महायुतीकडून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं. महायुतीसोबत असल्यानं मला दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि मला तिकीट दिलं, अशी स्पष्टोक्तीही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, विदर्भातील सहा उमेदवारांची घोषणा 

राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही 22 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्याच यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील समावेश आहे. तर  शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीत विदर्भातील सहा उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहे. यात यवतमाळच्या दिग्रस येथून विद्यमान आमदार व मंत्री संजय राठोड यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. बुलढाणामधून संजय गायकवाड, तर मेहकरमधून संजय रायमुलकर यांच्या नावाची शिंदेंच्या सेनेकडून घोषणा झाली आहे.अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळाली आहे. अभिजीत अडसूळ हे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत. तर रामटेकमधून आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भंडारामधून आमदार नरेंद्र भोंडेकर यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

पूर्व विदर्भात महायुती 32 जागा लढेल, त्या सर्व जागा जिंकूच!

सर्वसामान्य शिवसैनिकावर उपनेतेपदाची जबाबदारी देणे, हा त्या शिवसैनिकांसाठी सन्मानाची बाब आहे. मंत्रीपदाऐवजी पक्ष संघटनेची जबाबदारी हाचं मोठा सन्मान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ओळखलं, असं उद्धव ठाकरेंनी ओळखलं असतं तर, आज पक्ष फुटला नसता. सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व आमदार एकत्र असते असे म्हणत नरेंद्र भोंडेकर यांनी द्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर मी अपक्ष निवडणूक लढविली असती. राजकारणात सर्वचं पत्ते उघडायचे नसतात. भाजप मला प्रिय पक्ष आहे. भाजपमध्ये पूर्वीसारखीच सर्वांशी संबंध आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षासोबत समन्वय साधून जिल्ह्यातील तिन्ही जागा निवडून आणू.किंबहुना पूर्व विदर्भात महायुती 32 जागा लढतील आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणणार. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मोठा प्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा फुगा नक्कीच फोडणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे.

हे ही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेशमा काळेंची माघार
जळगाव विधान परिषद निवडणूक : महायुतीमधील बंडखोरीचा तिढा सुटला, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेशमा काळेंची माघार
साताऱ्यात खलबत! काल महायुतीच्या बैठकीला उपस्थिती, आज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात नेमकं काय?
साताऱ्यात खलबत! काल महायुतीच्या बैठकीला उपस्थिती, आज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात नेमकं काय?
कर्जमाफी झाल्यावर आंदोलन करण्यात काय अर्थ, 50 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, सामंतांचा रोहित पवारांना टोला
कर्जमाफी झाल्यावर आंदोलन करण्यात काय अर्थ, 50 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, सामंतांचा रोहित पवारांना टोला
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
Embed widget